जामखेड न्युज——
कोडिंग लॅबच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे दार खुले – आमदार रोहित पवार
आमदार पवार यांच्या हस्ते सारोळा शाळेत अमेझॉन कोडिंग (कॉम्प्युटर) लॅब लोकार्पण सोहळा संपन्न
तालुक्यातील जि.प.प्रा.सारोळा शाळेत जामखेड व कर्जत एकात्मिक विकास संस्था व अमेझॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,अमेझॉन कोडिंग (कॉम्प्युटर) लॅबचा लोकार्पण सोहळा जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी औक्षण व फुलांच्या वर्षांवात रोहित दादांचे स्वागत केले.तसेच शाळेतील मुलींनी आत्मसंरक्षणाच्या हेतूने सुरू केलेल्या, लाटी-काठीचे प्रात्याक्षिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर सादर केले.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना,सदर कोडिंग लॅब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्राज्ञानाचे धडे देण्यासाठी उपयुक्त ठरेल व इंटर ऍक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया रंजक,सुलभ,कृतिशील व परिणामकारक झाली असे मत व्यक्त केले. लाठी- काठी प्रात्यक्षिक, शालेय परिसर स्वच्छता, विद्यार्थी शिस्त व लोकसहभाग यांचे आवर्जून कौतुक दादांनी केले.तसेच येत्या सहा महिन्याच्या काळात सारोळा शाळेच्या संदर्भातील सर्व मागण्या व समस्या याचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दादांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार रोहित पवार, सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, मकरंद काशिद, पोलिस पाटील सिद्धेश्वर पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर सातपुते, मकरंद पवार, हनुमान काळे, मयुरीताई मुळे व इतर मान्यवर ,सारोळा ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीतेकरिता शाळेचे मुख्याध्यापक शहाजी जगताप, माजीद शेख, खंडेराव सोळंके, प्रशांत होळकर,अभिमान घोडस्वार, शबाना शेख व अमृता रसाळ व शाळेतील विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमकरिता जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.