तालुक्यातील साकत येथील बाजीराव गणपती वराट वय ८५ वर्षे यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे नातू दिनेश शिक्षक, दिपक शेती तर बंकट हा फोटोग्राफी व्यवसायात आहेत.
परिसरात ते नाना नावाने परिचित होते. भजन, किर्तनात गोड गायनाबद्दल त्यांची ख्याती होती. शोकाकुल वातावरणात रात्री ९ वाजता त्यांच्या वस्तीवर अंत्यविधी करण्यात आला.