दहा महिन्यांपासून फरार खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जामखेड पोलीसांनी केला जेरबंद

0
262

जामखेड न्युज——

दहा महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जामखेड पोलीसांनी केला जेरबंद

दहा महिन्यापुर्वी ऐन दिवाळीत तीस वर्षीय तरुणाचा मोबाईल चोरीच्या कारणावरून धोत्री परिसरात खुन करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी स्वप्निल नामदेव थोरात वय २९ वर्षे हा फरार होता यास दहा महिन्यांनंतर अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.

जामखेड जवळील साकत रोडवर धोत्री शिवारात जुन्या काँटन जिनिंग मीलच्या गेटसमोर मयत गणेश शिवाजी वारे वय ३० वर्षे रा. संगम जळगाव ता. गेवराई जि. बीड या तरुणाचा काठीने व पाईपने मारहाण करून खुन करण्यात आला होता. या घटनेतील एका आरोपीस जामखेड पोलीसांनी अटक केली होती. तर दुसरा आरोपी स्वप्निल नामदेव थोरात वय २९ वर्षे रा. सावरगाव ता. जामखेड हा तेव्हापासून फरार होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

या घटनेबाबत ७ आँगस्ट २०२३ रोजी आरोपी स्वप्निल नामदेव थोरात हा आरोपी सावरगाव येथे घरी असल्याची माहिती सपोनि सुनील बडे यांना मिळाली यानंतर त्यांनी तात्काळ त्याच्या पथकासह सावरगाव या ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली. सध्या हा आरोपी पोलीस कोठडीत आहे.

सदरची कामगीरी अहमदनगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे, पो.ना.कोपनर, पो.ना अविनाश ढेरे, पो.ना. भागवत,पो.कॉ. परेदेशी, पो.कॉ विजय सुपेकर, पो.कॉ नवनाथ शेकडे, पो. कॉ. सचिन देवढे, म.पो.कॉ. धांडे यांच्या पथकाने केली आहे.