जामखेड न्युज——
गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करणार – पोलीस निरीक्षक महेश पाटील
पहा नागपंचमी अनुषंगाने शांतता कमिटी मिटींगमध्ये घेतलेले निर्णय
जामखेडची नागपंचमी राज्यात प्रसिद्ध आहे. संपूर्ण राज्यातून लोक येतात तसेच आंनदमेळा, कुस्ती आखाडा तसेच नर्तिकेचे नाचगाणे, कीर्तन महोत्सव असे विविध कार्यक्रम असतात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे शांतता व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनापुढे आवाहन असते. या मेळाव्यात शांततेसाठी गुंडांचा बंदोबस्त करू तसेच सोई सुविधा उपलब्ध करण्यात येईल असे ठरले.
आज दि. ४आँगस्ट रोजी सकाळी तहसील कार्यालय, जामखेड येथे तहसीलदार श्री योगेश चंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर विभागाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे साहेब,
महावितरण विभाग प्रमुख, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, तसेच बाजार समिती सचिव , सभापती शरद कार्ले व शांतता कमिटी सदस्य मधुकर राळेभात, संजय कोठारी, संजय काशीद, संपत राळेभात, अभिजीत राळेभात, प्रवीण उगले, निखिल घायतडक, विकास राळेभात, प्रदीप टापरे, सनी सदाफुले, विकी सदाफुले, विकी घाययडक, बबन काशीद, पांडूरंग भोसले, योगेश अब्दुले व इतर सदस्य यांनी आगामी दिनांक २१ आँगस्ट रोजी होणाऱ्या नागपंचमीच्या अनुषंगाने करायच्या उपाययोजना वर चर्चा करण्यात आली.
उपाययोजना
1)आनंद मेळाव्याकरिता जागा निश्चित करणे.
२) पालखी मार्गावर येणारे समस्या
3) आनंद मेळा, नर्तिका डाव याठिकाणी आपले स्वयसेवक नेमावे.
4) नर्तिका डाव संदर्भात योग्य ते नियोजन करावे त्याठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावावे.
5) आनंद मेळाव्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व रस्त्याच्या कडेला असणारे व्यापारी यांनी आपल्या दुकानासमोरील एक कॅमेरा रोड कव्हर होईल असा बसवणे.
5) आनंद मेळा ठिकाणी वाहन पार्किंग याची व्यवस्था करणे.
6) आनंदमेळावा ठिकाणी वॉटर प्रूफ पोलीस मदत केंद्र उभारावे. त्या मदत केंद्रात सर्व सी सी टी व्ही चे चित्रीकरण पोलीसाना पाहता येईल असे लावावे.
7) डोळ्याची साथ सध्या चालू आहे त्या बाबत आरोग्य विभाग यांनी योग्य नियोजन करणे.
8) कुस्ती आखाडा या ठिकाणच्या पार्किंग व्यवस्था व्यवस्थित ठेवावी.
9) गुंड प्रवृत्तीचे लोक आनंद मेळावा मध्ये बाधा उपलब्ध करणार नाहीत या बाबत योग्य ते नियोजन करण्यात येऊन कारवाई करण्यात यावी.
10) शहरातील बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट चालू करून कोठेही अंधार राहणार नाही तसेच लाईट जाणार नाही या बाबत योग्य नियोजन करावे.
11) आनंद मेळाव्याच्या ठिकाणी ॲम्बुलन्स व अग्निशामक दलाचे गाडीचे व्यवस्थापन करणे.
12) आनंद मेळावा ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे.
13) आनंद मेळावा ठिकाणी पाळण्याचे दर निश्चित करावे.
14)मार्केट कमिटी जामखेड यांनी जागेचा निलाव लवकर करून घेणे .
यावरील सर्व विषयावर प्रशासकीय अधिकारी व शांतता कमिटी सदस्य यांची साधक बाधक चर्चा झाली आहे.
शांतता कमिटी मीटिंग करीता 45 सदस्य उपस्थित होते. मिटिंग शांततेत संपली आहे.
नागपंचमीचा आनंद मेळा शांतपणे पार पाडण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.