जामखेड न्युज——
नुकसानग्रस्त उडीद पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी – मंगेश आजबे
जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उडीद पिकांखाली क्षेत्र असते या वर्षी सुद्धा खूप शेतकऱ्यांनी उडीद या पिकाची पेरणी केली आहे. मागील दहा दिवसांत काहीतरी रोगाला उडीद पीक बळी पडत असून बहुसंख्य शेतकऱ्यांची उडीद पिके ही जळून गेली आहेत किंवा जळण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश दादा आजबे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या दुषित वातावरणामुळे उडीद पिक करपू लागला आहे
जळालेल्या उडीद पिकांचे पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, हा हंगाम शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि यामध्ये च निसर्गाने योग्य साथ दिली नाही किंवा पीक चांगले आले नाही तर शेतकरी हवालदिल होतो आणि नैराश्येच्या गर्तेत जातो,पिकावर खर्च तर झालेला असतो मग कर्जबाजारी व्हायची सुद्धा वेळ येते त्यामुळे साहेब आपण लक्ष घालून प्रशासनाला योग्य ते आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी चे प्रयत्न करावेत
अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश दादा आजबे, श्रीराम डोके, नितीन जगताप, अँड.ऋषीकेश डुचे, भाऊसाहेब डोके, विठ्ठल डोके, वाल्मिक डोके, सीताराम डोके, सागर डोके, अमोल राळेभात, हरी गरजे, अजिनाथ सानप, अनंता राळेभात, उत्तम करांडे,चंद्रकांत राऊत,किरण डोके, अंकुश राळेभात, बबन मुळे, गणेश काशीद ,राजेंद्र बेदरे,विकास अडाले,मनोज जाधव,दत्ता ढवळे, बापू बहिर,नितीन राऊत आदी उपस्थित होते.