जामखेड न्युज——
राज्यस्तरीय किक बाँक्सिंग व वुशू स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सत्कार
जामखेड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय किक बाँक्सिंग व वुशू स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली आहे. यातील काही खेळाडू देशपातळीवर खेळणार आहेत या सर्वांचा गुणगौरव व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा कार्यक्रम शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, किक बाँक्सिंगचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर जमदाडे, वुशू चे मार्गदर्शक श्याम पंडित, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, शिक्षक नेते केशव कोल्हे, सुनील यादव, किरण मुळे, सुरज काळे, दिपक सुरसे, सातपुते सर, बाळू निमोणकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धेत अदित्य जायभायला सुवर्णपदक व श्रेयस वराटला रौप्य पदक मिळाले होते. यातील आदित्य जायभाय हा पटना बिहार या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळण्यासाठी गेला आहे.
तसेच पुणे खराडी येते राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत योगेश वाघमोडे सुवर्णपदक, नुपूर सातपुते सुवर्णपदक, संकेत जमदाडे ब्राझ पदक, वैष्णवी सातपुते ब्राझ पदक जिंकले आहे. यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे रांची झारखंड येथे राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे.