जामखेड न्युज——
बांधखडक येथील निकृष्ट पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांसह उपोषण करणार – सरपंच राजेंद्र कुटे
तालुक्यातील बांधखडक येथील चव्हाण वस्ती ते दरडवाडी या रस्त्यावर असलेल्या नदीवरील पुलाचे झालेले काम निकृष्ट अतिशय दर्जाचे झाले असून तो पुल खचून नागरिकांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे सदर पुलाच्या कामाची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करावी तसेच पुलाचे काम निकृष्ट करणाऱ्या ठेकेदारास पाठीशी न घालता निकृष्ट काम केल्याबद्दल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा येत्या ६ दिवसांनंतर कोणतीही पुर्व कल्पना न देता बांधखडक येथील ग्रामस्थांना घेऊन जामखेड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण केले जाईल असा इशारा बांधखडकचे सरपंच राजेंद्र कुटे यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे जामखेड येथिल उपविभागीय अभियंता यांना आज दि. ४ आॅगस्ट रोजी या बाबतचे निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील समस्त ग्रामस्थ यांनी दि २६ जुलै २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जामखेड येथिल उपविभागीय अभियंता कार्यालयाकडे एका अर्जाद्वारे मौजे बांधखडक चव्हाणवस्ती ते दरडवाडी येथील झालेल्या पुलाची एम. बी. व इस्टीमेट ची मागणी केली होती परंतू अद्यापपर्यंत सदर माहिती देण्यात आलेली नाही. तसेच सदर काम निकृष्ट झाले बाबतही तक्रार केलेली होती परंतू सदर तक्रार असतांना देखील आपण जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार सदर पुलाच्या कामाचा दर्जा तपासणी करुनच त्याचे बिल अदा करणे आपेक्षित होते. परंतु आपण आपले खाजगी हित जोपसण्यासाठीच सदर बिल अदा केलेले आहे. असाही आरोप निवेदनकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे. तसेच सदर पुलाचे काम निकृष्ट झालेले आहे. या पुलावरुन बांधखडक येथील शालेय विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थ यांना ये-जा करण्यासाठी एकमेव पुल आहे. सदर पुल जर चालु पावसाळ्यात खचला आणि जर काही मनुष्यहानी झाली तर यास आपण व आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहिल यांची आम्ही आपणांस कल्पना देत आहोत.
तरी सदर ठेकदार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करु नये. व सदर निकृष्ट दर्जाचे कामाबद्दल त्याचेवर योग्य ती कठोर कारवाई करावी व पुलाचे काम ईस्टीमेंट नुसार करण्यात यावे. तसेच निवेदनात दिलेल्या मागणीनुसार योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा येत्या दिवसात बांधखडक ग्रामस्थांसह दि. ११ आॅगस्ट २०१३ पासून तहसिल कार्यालय जामखेड याठिकाणी अमरण उपोषण करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर बांधखडचे सरपंच राजेंद्र भिमा कुटे यांच्यासह संजय महादेव चव्हाण, नंदु महादेव सानप, रामचंद्र रंगनाथ चव्हाण, महादेव बाजीराव चव्हाण, हनुमंत आर्जुन कुटे यांच्या सह्य़ा आहेत. निवेदनाच्या प्रति तहसिलदार व पोलिस निरीक्षक जामखेड यांनाही देण्यात आल्या आहेत.