जामखेड न्युज——
जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन च्या अध्यक्षपदी डॉक्टर संजय राऊत भरघोस मताधिक्याने विजयी

जामखेड तालुका असोसिएशन अध्यक्ष पदासाठी दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर संजय राऊत प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. या पदाचे प्रबळ दावेदार डॉ संजय राऊत च होते हे या निकालाने सिद्ध झाले.

या यशाबद्दल त्यांचे जामखेड तालुक्यातील सर्व मित्र व परिवाराकडून कौतुक होत आहे. डॉक्टर- रुग्ण सुसंवाद राखणे, डॉक्टरांवरील होणारे हल्ले रोखणे.

संघटनेचे रजिस्ट्रेशन करणे, संघटनेच्या कार्यालयासाठी जागा घेऊन डॉक्टर भवन बांधणे ..संघटने मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवणे. … महिलां सदस्यांसाठी विविध उपक्रम राबवणे, तसेच सदस्यांचे आरोग्य जपण्यासाठी विविध मार्गाने प्रबोधन व कार्यशाळा आयोजित करणे सदस्यांसाठी वार्षिक सहल, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे
अशा प्रकारचे व्हिजन डॉक्टर संजय राऊत यांनी ठेवले आहे.
या निवडणुकीमधे डॉ बाबासाहेब कुमटकर यांनी डॉक्टर संजय राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला होता… निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉक्टर अनिल गायकवाड….यांनी काम पाहिले..
IMA चे अध्यक्ष डॉ गणेश झगडे ,डॉ आनंद लोंढे ,डॉ महेश घोडके..डॉ चंद्रकांत मोरे..डॉ सचिन काकडे डॉक्टर सुरेश काशीद.. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे ..डॉ शशांक शिंदे. डॉ प्रशांत गायकवाड, डॉ दिनेश रसाळ, डॉ राजेंद्र पवार डॉ अविनाश पवार, डॉ सागर शिंदे, डॉक्टर प्रवीण मिसाळ, डॉ फारुख, डॉ सर्फराज खान, डॉ तानाजी राळेभात, डॉ. महादेव पपवार, डॉ. दीपक वाळुंजकर, डॉ. सुधीर ढगे, डॉ प्रकाश खैरनार, डॉ प्रताप गायकवाड डॉ सुनील कटारिया डॉ संजय भोरे, डॉ सुरेश काशीद, डॉ.सुनिल वराट यांनी अभिनंदन केले आहे.




