Saturday, March 28, 2026
Home ताज्या बातम्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या पै. सुजय तनपुरेला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी...

आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या पै. सुजय तनपुरेला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – डॉ. भगवानराव मुरूमकर

0
238

जामखेड न्युज——

आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या पै. सुजय तनपुरेला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – डॉ. भगवानराव मुरूमकर

पै. सुजय तनपुरे याने आपल्या देशाला आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून आपल्या परिसराचा नावलौकिक देशात केला आहे. त्यामुळे त्याला सर्वोतोपरी मदत केली जाईल. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून सरकारी मदत तसेच शासकीय नोकरी यासाठी प्रयत्न केला जाईल. असे मत जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी व्यक्त केले.


शिऊर येथील पै. सुजय तनपुरे याने जॉर्डन येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले यामुळे परिसराचा व आपल्या देशाचा सन्मान वाढला आहे. हि. स्पर्धा २४ देशात होती यापैकी १७ देशाचे स्पर्धक सहभागी झाले होते. यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व सुजय तनपुरे याने केले होते. त्यांने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल जामखेड करांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून महावीर भवन पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक महेश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी प्रकाश पोळ होते. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, संजय वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती गौतम उतेकर, मंगेश (दादा) आजबे, जि.प.सदस्य सोमनाथ पाचरणे, रासपाचे विकास
मासाळ, प्रहारचे नय्युमभाई सुभेदार, जालींदर चव्हाण, डॉ. प्रकाश कारंडे, सदाशिव हजारे, बापु शिंदे, विकास तनपुरे, एकनाथ चव्हाण यांच्या सह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पैलवान व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मुरूमकर म्हणाले की, पैलवान सुजय तनपुरेला यशाच्या शिखरावर
पाहण्यासाठी खरा पडद्या मागचा सुत्रधार त्यांचे बंधू विकास तनपुरे यांनी आपल्या भावासाठी पैलवानकी सोडून व्यवसाय करुन सुजय यांना आर्थिक मदत केली तसेच नागनाथ तनपुरे हे माझे वर्गमित्र असून त्यांचे चिरंजीव सुजय तनपुरे यास २१०००/- रुपये बक्षीस सुपूर्द केला.

यावेळी डॉ. भगवानराव मुरूमकर एकवीस हजार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर एकवीस हजार, सभापती शरद कार्ले अकरा हजार, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ अकरा हजार अशी मदत जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ चव्हाण यांनी केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!