Monday, March 30, 2026
Home ताज्या बातम्या म. रा. मराठी पत्रकार संघाच्या नगर जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख !

म. रा. मराठी पत्रकार संघाच्या नगर जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख !

0
162

जामखेड न्युज——

म. रा. मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख !

राज्यातील आघाडीच्या असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाउपाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार लियाकत शेख यांच्या निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांनी केली.


लियाकत शेख गेली २० वर्षे जामखेड तालुक्यातील पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. दैनिक सार्वमत या वर्तमानपत्रातून त्यांनी पत्रकारितेस प्रारंभ केला. त्यानंतर १६ वर्ष दैनिक पुढारी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. तसेच मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव ,जामखेड मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष ,जामखेड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

राज्य संघटक संजय भोकरे,प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्यसरचिटणीस विश्वासराव आरोटे,यांच्या सूचनेनुसार हि निवड करण्यात आली,लियाकत शेख यांची म रा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे, शिवाजी इकडे, तालुकाध्यक्ष दीपक देवमाने, सचिव ओंकार दळवी, सचिन अटकरे, समीर शेख, संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन राळेभात, अमर चाऊस, नवीद शेख, रामहरी रोडे, संदेश हजारे, विजय राजकार, शंकर कुचेकर, अक्षय ठाकरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जिल्ह्यातील पत्रकारांसाठी भविष्यात मोठे काम करणार असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार करून प्रश्न सोडवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे लियाकत शेख यांनी निवड झाल्यानंतर सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!