पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील विविध योजनांचा लाभ घ्यावा – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

0
161

जामखेड न्युज——

पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील विविध योजनांचा लाभ घ्यावा – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

 

जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती जामखेड मार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ गरजू लाभार्थी यांनी घ्यावा असे आवाहन जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

राज्य शासन राज्यातील आर्थिक दुर्बल, शेतकरी मागासवर्गीय, अपंग आदी विविध समाज घटकांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवत असते. त्याप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातूनही आपल्या सेसफंडातून सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, बेरोजगार मागासवर्गीयांना बॅटरी संचलित रिक्षा, दुर्बल घटकातील मागासवर्गीय विद्यार्थिनींना लेडीज सायकल मागासवर्गीय शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र अशा विविध साहित्य वाटप करण्याचे नियोजन केले असून त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

 

विविध योजना

 

१. समाजकल्याण विभाग- बेरोजगार मागासवर्गीयांना बॅटरी संचलित रिक्षा खरेदीसाठी अनुदान योजना.
२. समाजकल्याण विभाग- इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनींना लेडीज सायकल पुरवणे.
३. समाजकल्याण विभाग- मागासवर्गीय शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे.
४. कृषी विभाग- शेतकऱ्यांना (सर्व प्रवर्गातील) कडबाकुट्टी वाटप करणे.
५. महिला व बालविकास विभाग – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थिनींना लेडीज सायकल पुरवणे योजना.

योजनांचे अर्जही ग्रामपंचायतकडे मिळतील.

वरील योजनांची पात्रता अटी-शर्ती,कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांचेकडे मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here