जामखेड न्युज——
त्रिदल माजी सैनिक संघाच्या वतीने शिवनेरी अकॅडमी येथे कारगिल विजय दिवस साजरा
दोन महिने प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत देशप्रेमाने प्रेरित होत आजच्या दिवशी पाकिस्तानी सैन्यावर विजय संपादन केला होता हाच विजय दिवस शिवनेरी अकॅडमी येथे त्रिदल माजी सैनिक संघाच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला.
भारतीय सैन्य दलातील सैनिक देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्यास मागे हटत नाहीत. त्याच्यामुळेच आपण सुखाने जगत आहोत. ठराविक दिवशीच त्यांचा मानसन्मान करण्याबरोबर त्यांच्याबद्दल नेहमीच आदर बाळगला पाहिजे. तसेच आजच्या सारखे जे दिवस असतील ते समाजातील सर्वांनीच साजरे केले पाहिजेत. जामखेड तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या सर्व प्रकारच्या शासकीय कामांना प्राधान्य दिले जाईल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत विविध मान्यवरांकडून कारगिल युद्धातील सैनिकांना अभिवादन करत आदरांजली अर्पण केली.
त्रिदल माजी सैनिक संघ जामखेड शाखेच्या वतीने जामखेड येथील शिवनेरी करीअर अकॅडमी येथे २४ वा कारगिल विजय दिवस आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी (जामखेड) श्रीमती सायली अशोक सोळंके, एच.यु. गुगळे उद्योग समूहाचे संचालक रमेश गुगळे, त्रिदल माजी सैनिक संघाचे राज्य अध्यक्ष संदिप लगड, महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती लगड, तहसिलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, त्रिदल माजी सैनिक संघ जामखेडचे अध्यक्ष सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, सचिव शहाजी ढेपे, उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे जामखेड तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, नगरसेवक डिगांबर चव्हाण, सूर्यकांत खर्डे, नंदकुमार नागवडे, अशोक चव्हाण, रोहिदास कडभणे, संतोष जगदाळे, वसंत माळवे, नवनाथ आंधळे, बबन नाईक, काशिनाथ शिंदे, विजय लेकुरवाळे, बळीराम ढाळे, विकास कोल्हे, दत्तात्रय डिसले, बाळासाहेब भोसले, गणेश डोळे, दामोदर राऊत, कचरू घोडके, वीरनारी रोहिणी नितीन जगताप, संगीता विठ्ठल घोलप, सुनिता छगन पवार आदी मान्यवरांसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्याबरोबरच, शहिद सैनिकांच्या विरनारी यांचाही सन्मान करण्यात आला आला. यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, उद्योजक रमेश गुगळे, श्रीमती सायली अशोक सोळंके, तहसिलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आदि मान्यवरांनी आपली शब्दरूप आदरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी ढेपे तर आभार सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन त्रिदल माजी सैनिक संघाच्या वतीने करण्यात आले होते.