जामखेड न्युज——
सुदंर मुलींना फुस लावून जामखेडमध्ये वेश्या व्यवसायात आणण्याचे मोठे रँकेट
परवानगी नसतानाही राजरोसपणे कलाकेंद्रांच्या नावाखाली अवैध धंदे
जामखेड कलाकेंद्रासाठी प्रसिद्ध आहे. शासनाने नियम पायदळी तुडवत आर्थिक फायद्यासाठी अनेक अनाधिकृत व्यवसाय केले जातात. लोककलेऐवजी डीजेचा थयथयाट असतो तसेच वेळेच्या नियमांचे कसलेही बंधन पाळले जात नाही. कलाकेंद्राच्या नावाखाली अनेक अनाधिकृत व्यवसाय तसेच मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी फोफावलेली आहे. वेश्या व्यवसाय करण्यासाठी राज्यातील अनेक मुलींना पैशाचे आमिष दाखवून आणले जात आहे असे एका पिडीत मुलीच्या आईने जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
उस्मानाबाद (धाराशिव) येथे मेडिकलचे उच्च फार्मा डीचे शिक्षण घेत असलेल्या मुलीची अशीच एका दलालाशी भेट झाली अनेक आमिषे दाखवत जामखेड येथील भाग्यलक्ष्मी कलाकेंद्रात आणले मुलीचे आई वडील पाच दिवसांपासून मुलीच्या शोधात सगळीकडे फिरत होते. शेवटी जामखेड चा पत्ता लागला आई वडील व मुलगी कलाकेंद्र चालक सगळेच जामखेड पोलीस स्टेशनला आणले रात्री उशिरा पर्यंत चौकशी सुरू होती.
पाच दिवसांपासून मुलगी कलाकेंद्रात आहे पण जामखेड पोलीसांत कलाकेंद्र चालकांनी कसलीही माहिती दिली नव्हती.
आर्थिक अमिषे दाखवत अनेक मुलींना या नरकात ढकलले जात आहे. याचे संपूर्ण महाराष्ट्रात एक रँकेट आहे. अनेक दलाल कमिशन वर हा धंदा करतात. आणि अनेक मुलींचे आयुष्य बरबाद करतात.
पिडीत मुलीचे आई वडिलांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे पत्रकारांशी बोलताना हंबरडा फोडला आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशी विनंती केली आज माझ्या मुलीबाबात ही घटना घडली आहे उद्या दुसऱ्या मुलीबाबात घडू नये म्हणून आताच या घटनेला वाचा फोडा. परिसरातील कलाकेंद्रावर अनेक अनाधिकृत व्यवसाय चालतात. यावर निर्बंधने हवीत.