जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरमधुन आतापर्यंत साडेसहा हजार रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत तसेच कसलेही महागडे औषध व रेनडेसीवीर न वापरता सर्व रूग्ण बरे केले आहेत त्यामुळे देशात आरोग्य सेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. एवढे मोठे काम करणाऱ्या कोविड सेंटरला सामाजिक बांधिलकी जपत कुसडगाव ग्रामस्थांनी आज आरोळे कोविड सेंटरमधील रूग्णांना जेवन व एकवीस हजार रुपयांची मदत केली
आरोळे हॉस्पिटल येथे असलेले कोविड सेंटर येथे सहा हजारच्या आसपास रुग्णसंख्या होती परंतु डॉ. रवि आरोळे व डॉ.शोभा आरोळे व त्यांच्या कर्मचारी वर्गामुळे रुग्णांमध्ये घट होत आहे. दरम्यान तसेच येथील रुग्णांना रोज जेवण तसेच इतर सुविधाही दिल्या जातात सध्या अडचणीत असलेल्या आरोळे हॉस्पिटल ला मदतीची गरज असताना त्यांना प्रतिसाद देत कुसडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने आज रोजी ८०० रूग्णांना जेवणासाठी शाकाहारी व मांसाहरी जेवणाचे आयोजन करून रुग्णांना जेवण देण्यात आले तसेच हॉस्पिटल रूग्णांसाठी आवश्यक ऑक्सीमिटरसाठी रुपये १० हजार व रोख रक्कम व अकरा हजार रुपये आरोळे कोविड सेंटरला मदत म्हणून देण्यात आले ते डॉ. रवी आरोळे यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, डॉ .रवि आरोळे, मनसेचे नेते दादासाहेब ( हवा )सरनोबत, सरपंच बापूसाहेब कार्ले, उपसरपंच नागेश कात्रजकर , ग्रा.प.सदस्य अंकुश कात्रजकर,पोलीस पाटील निलेश वाघ, प्रसन्न कात्रजकर,गणेश कात्रजकर, केशव कात्रजकर, रामभाऊ टिळेकर, गोकुळ कात्रजकर धनंजय राऊत,भरत भोगल, प्रदीप कात्रजकर ,युवराज कात्रजकर, लक्ष्मण लेकुरवाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आरोळे कोविड सेंटरला केलेल्या मदतीबद्दल कुसडगाव ग्रामस्थांचे डॉ. रवी आरोळे यांनी आभार मानले.