जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत हजारो रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत तसेच विना रेमडेसीवीर व महागडे औषधे न वापरताही रूग्ण बरे होतात हे दाखवून दिले आहे यामुळे संपूर्ण देशात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे परिसरातील दानशूर आरोळे कोविड सेंटरला भरभरून मदत करत आहेत. बीड जिल्ह्य़ातील जवळाला येथिल श्री क्षेत्र कालिका माता ईश्वर भारतीबाबा संस्थानने आरोळे कोविड सेंटरला सातशे किलो खरबुजाचे वाटप केले.
श्री क्षेत्र कालिका माता ईश्वर भारती बाबा संस्थान जवळाला ता.पाटोदा संस्थापक अध्यक्ष व इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आण्णासाहेब जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचे प्रिय मित्र सेवानिवृत्त आंगद कोल्हे यांनी व जनसेवक ब्रह्मा कोल्हे, चैतन्य अॅटो सर्विस सेंटर चे मालक तुषार देवकर, मित्र परिवारा तर्फे आरोळे कोविड हॉस्पिटला ७००किलो खरबुज वाटप करण्यात आले.
यावेळी सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे आस्तिक कोल्हे, डॉ. मंगेश कोल्हे, रामभाऊ कोल्हे, कृष्णा कोल्हे यांनी आरोळे कोविड सेंटरच्या समन्वयक सुलताना (भाभी) शेख यांच्याकडे सुपूर्द केले