जामखेड न्युज——
मनोहर इनामदार यांचे शैक्षणिक कार्य तालुक्यासाठी दिशादर्शक – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
दत्तवाडी शाळेतील १००हून अधिक विद्यार्थी विविध गुणदर्शन स्पर्धेत यशस्वी, ७१ विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र,तर १६ विद्यार्थी जिल्हागुणवत्ता यादीत आणण्यात मोलाचे योगदान.
सुट्टीतील मोफत मार्गदर्शन शिबिरांचा तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना फायदा
शालेय जीवनात स्पर्धा परीक्षा तसेच विविध गुणदर्शन स्पर्धा यांच्या सक्रीय सहभागातून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होतो.म्हणूनच आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुट्टीच्या काळात मनोहर इनामदार यांनी शिष्यवृत्ती,नवोदय,सैनिक स्कूल,प्रज्ञा शोध इ.स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी नान्नज केंद्रातील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी (धोंडपारगाव) येथे मोफत मार्गदर्शन शिबिरांचे सातत्याने केलेले आयोजन तालुक्यासाठी उपयुक्त ठरले आहे. अनेक शाळांतील गुणवंतांचा त्यांनी दत्तवाडी शाळेच्या वतीने गौरव केला.राज्यातील स्पर्धा परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी केल्या तज्ज्ञांना तसेच प्रसिद्ध साहित्यिक, समाजसेवक, उद्योजक, खेळाडू,वैज्ञानिक,व्याख्याते ,न्यायाधीश,राज्य तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक अशा विविध प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना मार्गदर्शनासाठी शाळेत आमंत्रित केले. गुणवत्ता संवर्धनाच्या दृष्टीने प्रेरक असलेले त्यांचे शैक्षणिक कार्य तालुक्यासाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांनी काढले.
मनोहर इनामदार हे धोंडपारगाव येथील दत्तवाडी शाळेत मागील पंधरा वर्षे कार्यरत होते.या सेवाकाळात त्यांचे हस्ताक्षर,वक्तृत्व,निबंध,कथाकथन,वैयक्तिक गायन,वेशभूषा,सांस्कृतिक,समूहगीतगायन,श्लोक पाठांतर ,स्वरचित काव्य सादरीकरण इ.विविध गुणदर्शन स्पर्धांत १०० हून अधिक विद्यार्थी केंद्र ,तालुका व जिल्हास्तरावर चमकले.शिष्यवृत्ती परिक्षेत तब्बल ७१विद्यार्थी पात्र ठरले, तर १६ विद्यार्थ्यांचा जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश झाला. २ विद्यार्थीनींची नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे ,२ विद्यार्थ्यांची शासकीय विद्यानिकेतन धुळे येथे निवड झाली,तर एका विद्यार्थीनीची जि.प.अहमदनगर आयोजित विमानाने इस्रो सहलीसाठी निवड झाली.जीवन शिक्षण,किशोर,सावित्रीच्या लेकी,शिक्षणपत्रिका इ.विविध प्रसिद्ध नियतकालिकांत त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले असून आम्ही स्वच्छतादूत,बिल्वदल,प्रेरणादायी उपक्रमांची प्रयोगशाळा व गवसणी या त्यांच्या ४ पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. जि.प.अहमदनगर च्या वतीने शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका निर्मिती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मा.शिक्षणाधिका-यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जामखेड तालुक्याचे गुणवत्ता संवर्धनाचे केंद्र तथा शैक्षणिक तीर्थक्षेत्र मानल्या जाणा-या शिऊर येथील जि.प.प्रा.आदर्श शाळा लटकेवस्ती येथे सोमवार दि.१७जुलै२०२३रोजी ‘शिक्षण विभाग शाळेच्या दारी’ या मा.श्री.बाळासाहेब धनवे गटशिक्षणाधिकारी पं.स.जामखेड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांतर्गत झालेल्या गुणवंतांच्या गौरवासाठी मा.गटशिक्षणाधिका-यांसह सुनील जाधव व गणपत चव्हाण हे विस्तार अधिकारी तसेच राम निकम,संतोषकुमार राऊत,सुरेश मोहिते,मल्हारी पारखे,बाबासाहेब कुमटकर,रामदास गंभिरे,संतोष वांडरे,नारायण राऊत हे केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विभागातील सुनील भामुद्रे,तुषार तागड,जावेद शेख,शेख मुद्देस्सीर,रमेश गिते,शाहू फाळके,संतोष कदम,जहांगीर मुलांनी,श्रीम.नागरगोजे,श्रीम.झिंजुर्के व कार्यालयातील सर्व लिपिक उपस्थित होते. यावेळी लटकेवस्ती शाळेतील पूर्वउच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२३मध्ये जिल्हा गुणवत्तायादीत आलेल्या शंभूराज कोल्हे,साईश बहीर,राजवीर भापकर,गौरव लवांडे,लक्ष्मी लटके,श्रेया गव्हाणे व त्या निकम या ७ विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या आदर्श शिक्षिका श्रीम.अनिता पवार पिंपरे व श्रीम रसिका गाढवे आणि लटकेवस्ती शाळेत बदलीने नुकत्याच हजर झालेल्या श्रीम.सीमा भोगल यांचा शिक्षणविभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांचा ‘शिक्षण विभाग शाळेच्या दारी’ हा उपक्रम अत्यंत नाविन्यपूर्ण,प्रेरणादायी व स्तुत्य असून त्यांच्या हस्ते झालेल्या सन्मानाने आपण कृतार्थ व कृतकृत्य झाल्याची भावना श्री.मनोहर इनामदार यांनी सत्कारानंतर व्यक्त केली.सध्या ते नायगाव केंद्रातील जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथे कार्यरत आहेत.