जामखेड न्युज——-
पै.प्रविण (भैय्या) करडकर यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील मुलांना खाऊ वाटप

जामखेड येथील पै.प्रविण (भैय्या) करडकर यांनी त्यांच्या वाढदिसानिमित्त निवारा बालगृह जामखेड येथे भेट देऊन आपला अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला व अनाथ गोरगरीब मुलांना खाऊ वाटप केली त्यावेळी बालगृहातील सर्व स्टाफ व लहान लहान मुलांनी प्रविण दादा यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केले.

पै.प्रविण (भैय्या) करडकर यांनी आपला वाढदिवस
तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ, निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना खाऊचे वाटप करत उत्साहात साजरा करण्यात आला याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

यावेळी त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा नेते कृष्णा डुचे, संदीप सांगळे, महेश पवार, अनिल ठाकरे, अजय वाकळे, कांतेज समुद्र,आबासाहेब जाधव,शंकर डूचे, मंगेश पवार,अशोक डूचे, मुकेश साळवे,संदीप डूचे, संदेश पवार,महेश डोके तसेच निवारा बालगृहातील बाल गोपाल इत्यादी उपस्थित होते.





