जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जामखेड शहरात सध्या कडक निर्बंध घातले आहेत. लाॅकडाउन आहे पण अत्यावश्यक सेवा वगळून कडक निर्बंध आहेत तरीही लोक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरतात. यामुळे कोरोना संसर्ग वाढतो. तो रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची शहरात विनाकारण फिरणाऱ्या फिरस्त्या लोकांकडून आर्थिक दंडाबरोबरच कोरोना चाचणी सुरू केल्याने शहरातील विनाकारण फिरणाऱ्यांची वर्दळ कमी झाली आहे. प्रशासनाचा हा निर्णय सर्वसामान्य लोकांना खुपच आवडला आहे. यामुळे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांचे अभिनंदन होत आहे.
गर्दी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्या करण्यासाठी पोलीस अधीक्षक माननीय मनोज पाटील यांचे आदेश आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली यासाठी जामखेड नगर परिषदेचे आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांचे पथक आणि पोलिसांच्या बरोबर खार्डा चौकात चेक पोस्टवर तैनात करण्यात आले आहे. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तहसीलदार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की सध्या शहरासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण लोक फिरत असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे म्हणून कोरोना तपासणी किट उपलब्ध करून ठीक ठिकाणी तपासण्या करून पॉझिटिव्ह आढळल्यास त्या व्यक्तीस ताबडतोब ग्रामीण आरोग्य प्रकल्प डॉक्टर आरोळे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे तसेच त्यांच्या परिवाराची सुद्धा तपासणी करावी यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, वसंत सानप ,राहुल राखेचा, मैनुद्दीन तांबोळी, तुकाराम अंदुरे, सचिन घुमरे आदी उपस्थित होते.