आरोळे हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये झिंगाट गाण्यावर ८० वर्षाच्या आजोबांनी भन्नाट डान्स केला. त्यांचा हा डान्स पाहून इतरांही डान्स करण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. कोरोना महामारीमुळे श्रीमंतापासून ते गरीब प्रत्येक जण भितीच्या सावटाखाली आहेत. अनेक रुग्णालयांनी तर माणुसकीला काळिमा फासला आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी तर रुग्णालय प्रशासनावर गुन्हे दाखल केले आहेत. पण आरोळे हॉस्पिटल याला अपवाद आहे. रुग्णांच्या चेहर्यावरील कंटाळा, भिती गेली पाहिजे, याकडेही या हॉस्पिटलमध्ये लक्ष दिले जाते. याच भावनेतून आरोळे हॉस्पिटलमधील समन्वयक सुलताना शेख यांनी सर्व रुग्णांना झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावले, आणि चक्क ८० वर्षाच्या आजोबांनी देखील या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे सेंटरमधील सर्वच वातावरण बदलून गेले. रुग्णांच्या मनातील भीती देखील पळुन गेली व संपुुर्ण कोविड सेंटर मधील वातावरण चैैैतन्यमय झाले होते. संपुुर्ण कोविड सेंटर मधील रूग्णांनी मनमुुराद आनंद लुुटला.
आरोळे कोविड सेंटर मध्ये ऐंशी वर्षाच्या आजोबांचा झिंगाट गाण्यावर झिंगाट डान्स
जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरमधुन आतापर्यंत साडेसहा हजार रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. तेही पुर्णपणे मोफत तसेच एकही रेमडेसीवीर इंजेक्शन न वापरता महागडे औषध न वापरता सर्व रूग्ण बरे केलेले आहेत. त्यामुळे संपुर्ण देशात आपल्या आरोग्य सेवेचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. सध्या सातशे रूग्ण आरोळे कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. या सर्वांना मनसोक्त आनंद व्हावा मानसिक आरोग्य ठणठणीत राहावे म्हणून आरोळे कोविड सेंटर मध्ये झिंगाट गाण्यावर डान्स ठेवण्यात आला होता यामध्ये ऐंशी वर्षाच्या आजोबा आजी पासून सर्वानी मनमुराद आनंद लुटला यामुळे संपूर्ण कोविड सेंटर मधील वातावरण चैतन्यमय झाले होते.