जामखेड न्युज——
विद्यार्थी व नागरिकांचे रस्त्याअभावी हाल, चिखल तुडवत करावा लागतो प्रवास
जामखेड शहरातील आदित्य गार्डन परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच या भागातील विद्यार्थ्यांना रस्त्यावरील चिखल तुडवत जावे लागत आहे. रस्त्यावर चिखल व पाण्याचे डबके साचलेले आहेत. विद्यार्थी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत तरीही नगरपरिषदेचे याकडे पुर्णतः दुर्लक्ष आहे.
सध्या लहान स्वरूपात कधीतरी पाऊस येत आहे. लहान पावसामुळे रस्त्यावर चिखल व मोठ्या प्रमाणात दलदल असते. शेजारून गाडी गेली की, चिखल अंगावर उडतो तसेच अनेकदा विद्यार्थी पाय घसरून चिखलात पडतात अनेकदा कपडे भरतात दप्तर भिजते अनेक वेळा नगरपरिषदेकडे मागणी करूनही मुरूम टाकलेला नाही.
या भागात आदित्य मंगल कार्यालय, मिहिर मंगल कार्यालय, तांबे यांची शाळा आहे तसेच अनेक बंगले आहेत. चिखल व डबक्यांचा त्रास सर्वानाच सहन करावा लागत आहे.
चौकट
परिसरातील नागरिक व विद्यार्थी यांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. सध्या येथील रस्ता म्हणजे असुन अडचण व नसून खोळंबा अशी स्थिती आहे. रस्त्यावर मुरूम टाकावा म्हणून नगरपरिषदेकडे अनेक वेळा मागणी केली आहे. पण नगरपरिषद लक्ष देत नाही याचा त्रास नागरिक व विद्यार्थ्यांना होत आहे.
महादेव महाजन (रहिवासी)