शेकडो सैनिक घडविणारी शिवनेरी अकॅडमी अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी एकमेव पर्याय

0
115

जामखेड न्युज——

शेकडो सैनिक घडविणारी शिवनेरी अकॅडमी

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी एकमेव पर्याय

भारतीय सैन्यदलात जाण्यासाठी जे तरूण अग्निवीर भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी जामखेड येथील शिवनेरी करीअर अकॅडमी येथे प्रशिक्षण घेणे हा एक उत्तम पर्याय असून या ठिकाणाहून दोनशेहून अधिक मुलं-मुली विविध ठिकाणी भरती झाले आहेत.

शिवनेरी अकॅडमी जामखेडचे संचालक कॅप्टन लक्ष्मणराव भोरे (से. नि.) यांनी अग्निवीर भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना आवाहन केले आहे की, अग्निवीर भरतीसाठी तयारी करणाऱ्या बहादूर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मागील वर्षी २०२२ मध्ये पूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अग्निवीर भरती रॅलीमध्ये कोरोनाच्या काळात भरती रॅली न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना २१ वरून २३ वयाची अट केली होती. त्यामुळे खूपच संख्या रॅलीसाठी हजर होती. त्यामुळे सिलेक्शन सुद्धा तितकेच कडक झाले व रिझल्ट सुद्धा खूपच कमी लागला.

आता येणाऱ्या अग्नीविर भरतीमध्ये अगोदर लेखी परीक्षा (CEE) झालेली असून त्यातून जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचेच फिजिकल व मेडिकल होईल तरीही संधी न डावलता वेळ आणखीन गेलेली नाही तरी सर्व तरुण तडफदार विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात येते की आपण पूर्ण तयारीला लागून “जिद्द चिकाटी सातत्य व संयम बाळगल्यानंतर नक्कीच यश मिळते” तरी आपण सर्वांनी हार न मानता जोमाने व जिद्दीने परत तयारी करावी यश नक्कीच तुमच्या पायथ्याशी आहे. अग्नीवीर,स्टाफ सिलेक्शन,महाराष्ट्र पोलीस सर्वच बॅच आगोदरच चालू आहेत.

“दशा बदलायची असेल तर दिशा बदला. नक्कीच शिवनेरी अकॅडमी एक वेळा अवश्य भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करा.

शिवनेरी अकॅडमीचे वैशिष्ट्ये

सर्वच दलाकरिता योग्य मार्गदर्शन.

तज्ञ वा अनुभवी शिक्षक भरती क्षेत्रातील आठ वर्षांचा अनुभव.

प्रत्येक शनिवारी शारीरिक व लेखी परीक्षा पूर्ण तयारी

निवास व भोजनाची उत्तम सोय व मिनरल वॉटर सुविधा

माजी सैनिक व एनसीसी विद्यार्थ्यांना विशेष सवलत

व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर व वैयक्तिक लक्ष.

कॅप्टन लक्ष्मण भोरे (से. नि.) संचालक शिवनेरी अकॅडमी जामखेड मो. नं. 9158006663 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here