जामखेड न्युज——
अडसुळ टेक्निकल कॅम्पसमध्ये कंपन्यांचा मेगा प्लेसमेंट ड्राइव्ह
सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध आडसुळ
अडसुळ टेक्निकल कॅम्पसमध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिली जात आहे. या सुवर्ण संधीचा इच्छूक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध आडसुळ यांनी केले आहे.
येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) व अभियांत्रिकी पदवीच्या (डिग्री) सर्व शाखांसाठी, तसेच बी.एस्सी., बी.कॉम., बी.बी.ए., बी.सी.ए., बी.ए. व एम.बी.ए. च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे, चाकण, सुपे, अहमदनगर, रांजणगाव व गुजरात औद्योगिक
वसाहतींतील ३५ ते ४० बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कॅम्पस इंटरव्ह्यू आठ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. एकूण दोन हजार पदांची भरती होणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २.५ ते ८.५ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. आठ जुलै रोजी संध्याकाळी लगेच त्यांना नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती कॅम्पसचे संचालक व प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील यांनी दिली. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध आडसूळ यांनी केले आहे.