जामखेड न्युज——
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात शरद पवार यांनी एकजूट केली म्हणून भाजपाने राष्ट्रवादी फोडली
संपूर्ण जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या बरोबरच
शरदचंद्र पवार यांचे देशाच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात शरदचंद्र पवार यांनी एकजूट करण्याचा प्रयत्न केला यामुळेच भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली असे मत आज जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर करण्यात आले. आणि संपूर्ण जामखेड तालुका हा शरदचंद्र पवार यांच्या बरोबर आहे असे सांगितले.

आज दि. ३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कालच्या घटनेचा खर्डा चौकात निषेध करण्यात आला यावेळी प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, प्रकाश सदाफुले, सुरेश भोसले, दादा उगले, वैजनाथ पोले, उमर कुरेशी, ईस्माईल सय्यद, अमित जाधव, वसीम सय्यद, पोले नाना, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, चाॅद तांबोळी, बजरंग डुचे, दिंगाबर चव्हाण, पिण्टु बोरा, राजेंद्र पवार, जुबेर शेख, शहाजी राळेभात, आहेरे सर, कुंडल राळेभात, काकासाहेब कोल्हे, काका साहेब चव्हाण, नरेंद्र जाधव, प्रशांत हिरवे, बापु साहेब शिंदे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडणाऱ्या कालच्या घटनेचा निषेध केला. तसेच संपूर्ण जामखेड तालुका शरद पवार यांच्या बरोबर असल्याचे जाहीर केले.
भाजपा सरकार शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात आहे त्यामुळे पवार साहेबांनी त्यांच्या विरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न केला तर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. या देशात स्व – कर्तृत्ववाने मोठे झालेले बाबासाहेब ठाकरे व शरदचंद्र पवार हे नेते आहेत त्यांनी कधीही आपल्या तत्वाला मुरड घातली नाही. संपूर्ण जामखेड तालुका हा शरदचंद्र पवार यांच्या बरोबर आहे असे सांगितले.



