गुन्हेगारांना शासन व सज्जनांचे रक्षण हेच पोलीसांचे काम – पोलीस निरीक्षक महेश पाटील आषाढी एकादशी व बकरी ईदच्या अनुषंगाने जामखेड पोलीसांचा रूट मार्च

0
152

 

जामखेड न्युज——

गुन्हेगारांना शासन व सज्जनांचे रक्षण हेच पोलीसांचे काम – पोलीस निरीक्षक महेश पाटील

आषाढी एकादशी व बकरी ईदच्या अनुषंगाने जामखेड पोलीसांचा रूट मार्च

 

जामखेड शहर किंवा जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत कोणीही समाजकंटक कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांचा बंदोबस्त करू कारण समाजातील चांगल्या व शांतताप्रिय व्यक्ती आमच्या सोबत असून त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी जामखेड पोलीस दल नेहमीच कटीबध्द असेल तसेच गुन्हेगारांना शासन व सज्जनांचे रक्षण हेच पोलीसांचे काम आहे असे मत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिले.

आगामी आषाढी एकादशी व बकरी ईद हे एकाच दिवशी येणारे दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत व कोणीही कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आज दि २७ जून रोजी रोजी सायंकाळी ६:०० ते ७:१० वाजताचे दरम्यान जामखेड पोलीस दलाच्या वतीने जामखेड शहरात रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चची सुरुवात जामखेड पोलीस स्टेशन येथे होऊन बीड रोड काॅर्नर-जयहिंद चौक-काझी गल्ली-सय्यदनगर-खर्डा रोड- तपनेश्वर रोड-नुराणी कॉलनी-खाडे नगर-बसस्थानक-मेन रोड-खर्डा चौक या मार्गावरून जाऊन खर्डा चौकातील पोलीस चौकीजवळ या रूट मार्चचा समारोप करण्यात आला.

यावेळी जामखेडकरांना शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन करताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, जामखेड शहर व पोलीस स्टेशन हद्दीत शांतता राखण्यासाठी मी काही व्यक्तिंना अगोदरच तडीपार केलेले आहे. काहींचे तडीपारीचे तर काहींचे स्थानबद्धतेचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत . काहींना जामखेड शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काहींवर विभागीय दंडाधिकारी यांचेमार्फत कारवाई सुरू आहे. गुन्हेगारांवर कठोर शासन व सज्जनांचे रक्षण करू हाच आजच्या रूट मार्चचा उद्देश आहे. सज्जनांचे रक्षण करून व दुर्जनांचा निर्धारण करू असाही संदेश यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला.

या रूट मार्चमध्ये १ अधिकारी २५ पोलीस अंमलदार, ४ होमगार्ड यांच्या सामावेश होता साधारण सव्वा तास रुट मार्च चालला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here