जामखेड न्युज——
जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जामखेड परिसरातील पाचशे विद्यार्थ्यांना होणार उद्या जातीच्या दाखल्याचे वाटप!!
शासकीय कार्यालयात येऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठी किचकट प्रक्रिया पूर्ण होत नाही हीच अडचण ओळखून लक्ष्मी पवार यांच्या जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील पाचशे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात येणार आहेत.
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य रँली व सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती जनविकास सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका लक्ष्मी पवार यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार प्रा राम शिंदे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून किसनराव चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, योगेश चंद्रे तहसीलदार जामखेड, नामदेव भोसले साहित्यिक, प्रकाश पोळ गटविकास अधिकारी जामखेड, महेश पाटील पोलीस निरीक्षक जामखेड, अजय साळवे मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद जामखेड, राजेंद्र सुपेकर कृषी अधिकारी, बाळासाहेब धनवे गटशिक्षणाधिकारी जामखेड, डॉ. भगवानराव मुरूमकर माजी सभापती पंचायत समिती जामखेड, राजेंद्र काळेकाळे संस्थापक अध्यक्ष अदिवासी पारधी समाज संघटना, डॉ. शशांक वाघमारे वैद्यकीय अधिक्षक, शोभा आरोळे ग्रामीण आरोग्य प्रकल्प, संजय कोठारी सामाजिक कार्यकर्ते, विनायक राऊत, भारती दिदी, लक्ष्मी पवार संस्थापक अध्यक्ष जनविकास सेवाभावी संस्था जामखेड, संतोष पिंपळे संचालक, राम पवार सामाजिक कार्यकर्तेकार्यकर्ते यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जामखेड येथील आदित्य मंगल कार्यालयात सोमवार दि. २६ जून रोजी राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त दुपारी १२.३० वाजता दाखले वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी पवार संस्थापक अध्यक्ष जनविकास सेवाभावी संस्था जामखेड यांनी केले आहे.
राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त सोमवारी भव्य रँली व जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात येणार आहे दुपारी १२.३० वाजता आदित्य मंगल कार्यालयात जामखेड तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांच्या पाचशे पालकांचे व विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले वाटप करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी पवार संस्थापक अध्यक्ष जनविकास सेवाभावी संस्था जामखेड यांनी केले आहे.