योगामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते – योगशिक्षक दिगांबर फुटाणे श्री साकेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

0
132

जामखेड न्युज——

योगामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते – योगशिक्षक दिगांबर फुटाणे

श्री साकेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारायचे असेल, दीर्घायुष्य मिळवायचे असेल, तर योग करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. योगासने केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होतात. योगामुळे शरीरातील अंतर्गत अवयव निरोगी राहण्यास मदत होते. असे मत योगशिक्षक दिगांबर फुटाणे यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त श्री. साकेश्वर विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसमवेत योगासने प्रात्यक्षिक केले व विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले. यावेळी योगशिक्षक दिगांबर फुटाणे, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, सुलभा लवुळ, सचिन वराट, अतुल दळवी, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी हजर होते.

यावेळी योगाची माहिती देताना फुटाणे म्हणाले की,
नियमित योग केल्यास तुम्ही आजारी पडत नाही. एवढेच नाही तर योगाभ्यास केल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव दूर होतो. योगा केल्याने हृदय, किडनी, यकृत आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो. म्हणजेच, जर तुम्ही रोज योगा केला तर तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता, ज्यामुळे दीर्घायुष्य मिळू शकते. असे सांगितले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी योगासने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here