जामखेड न्युज——
पोस्टाचा गलथान कारभार
55 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात पाठवलेले पार्सल गेल्या तेरा दिवसांपासून वेगवेगळ्या विभागात फिरतच आहे.
अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड येथील एका शेतकऱ्याने खर्डा ता. जामखेड येथून पोस्टाने गावरान भाजीपाला बियाणे मागवले होते. खर्डा ते अंमळनेर 55 ते 60 किलोमीटर अंतर आहे. पण गेल्या तेरा दिवसांपासून ते पार्सल वेगवेगळ्या विभागात फिरत आहे. पोस्टाच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी व ग्राहक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एका शेतकऱ्याकडून गावरान भाजीपाला बियाणे मागवले होते.त्या शेतकऱ्याने ता.9 रोजी खर्डा पोस्ट ऑफिस मधून अंमळनेर भांड्याचे येथे पाठवले. खर्डा ते अंमळनेर हे अंतर जामखेड मार्गे 56 की.मी.आहे.तर पाटोदा मार्गे 58 की.मी.आहे.मला बियाण्याचे पार्सल जास्तीतजास्त 5 दिवसात मिळायला हवे होते.ज्ञपरंतु,ते पार्सल परवा अहमदनगर येथे गेल्याचा मेसेज आला.तर परत ते पार्सल संभाजीनगर येथे गेल्याचा मेसेज आला आहे.पार्सल वर पिनकोड लिहिलेला आहे.ते पार्सल सरळ अंमळनेर(भांड्याचे)येथे यायला पाहिजे होते.याचा अर्थ पोस्टाचे कर्मचारी पोस्टाची सेवा गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते.तंत्रज्ञानाच्या युगात पोस्टानेही डिजिटल बदल करत वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन मोठा ग्राहक वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे.पण अशा प्रकारे सेवा मिळत असेल तर तर ते पोस्टाचे अपयश आहे.
चूक पोस्टाची भुर्दंड शेतकऱ्याला
खूप ठिकाणी पार्सल गेल्यामुळे बियाणे खराब होऊ शकते. हे पार्सल किती विभाग आणि जिल्हे फिरून कधी पर्यंत शेतकऱ्याकडे पोहचते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बियाणे पाठवलेल्या शेतकऱ्याचा दिलदारपणा बियाणे मिळाले का रोज विचारणा.मिळाले नसेल तर पुन्हा पाठवतो.चूक पोस्टाची भुर्दंड शेतकऱ्याला.