जामखेड न्युज——
योगशास्त्रामुळे उत्तम आरोग्य लाभते – योगशिक्षक बाळासाहेब पारखे
ल. ना. होशिंग विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आज ल.ना. होशिंग विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या योग दिनानिमित्त विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे यांनी आज योग वर्ग सकाळी सात ते आठ या वेळेत घेतला.सुरुवातीला योगदिन व योगाची पूर्ण माहिती दिली.
योगशास्त्रामुळे उत्तम आरोग्य लाभते त्यासाठी आपण नियमितपणे योग साधना केली पाहिजे असे महत्त्व प्रात्यक्षिक करून व माहिती देऊन सांगितले.त्याचबरोबर सर्व कर्मचारी विद्यार्थी यांच्याकडून योग प्रात्यक्षिक करून घेतले.
कार्यक्रमाच्या वेळी जामखेड तालुका तहसीलदार श्री योगेश चंद्रे साहेब,दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री अरुणशेठ चिंतामणी साहेब,पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी, शिवनेरी अकॅडमीचे कॅप्टन भोरे मेजर व त्यांचे विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग साहेब यांनीही योग दिनाचे महत्त्व याबद्दल माहिती दिली.
उपप्राचार्य पोपट जरे साहेब,उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे साहेब, पर्यवेक्षक श्री प्रवीण गायकवाड साहेब, शिक्षक प्रतिनिधी श्री किशोर कुलकर्णी सर व समारंभ प्रमुख श्री पोपट जगदाळे सर,या संपूर्ण योग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख श्री अनिल देडे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्री बबन राठोड सर यांनी केले.तसेच या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू उपस्थित होते.या योग दिना साठी प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.