जामखेड न्युज——
जागतिक योग दिनानिमित 2300 विद्यार्थ्यांनी सामूहिक योगासने करून नागेश विद्यालयात योग दिन साजरा
21 जून 2023 हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो जामखेड मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये योग दिन उत्साहामध्ये संपन्न झाला.
सतरा महाराष्ट्र बटालियन अहमदनगर चे श्री नागेश विद्यालय युनिटने या योग दिनाच्या आयोजन केले होते. यामध्ये नागेश विद्यालय , ज्युनियर कॉलेज, कन्या विद्यालय चे एकूण 2300 विद्यार्थी शिक्षक एनसीसी कॅडेट ,पालक सहभागी झाले.
एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी विविध व्यायाम व कवायत प्रकार घेऊन एनसीसी कॅडेट यांनी सूर्य नमस्कार, योगासने प्रात्यक्षिक सादर केले संतोष सरसमकर यांनी विविध योगासन व मनोरे यांचे प्रात्यक्षिक दाखवून माहिती सांगितली. शंभूलाल बडे यांनी कृतीयुक्त गाण्यातून व्यायाम प्रकार घेतले.
यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के ,मुख्याध्यापिका चौधरी के डी पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे,ज्युनियर कॉलेज विभागचे प्रा विनोद सासवडकर एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, संतोष सरसमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य मडके बीके यांनी विद्यार्थ्यांना योग व व्यायामाचे महत्त्व सांगून दररोज विद्यार्थ्यांनी व्यायाम करावा व आपली शारीरिक क्षमता वाढवून चांगले कार्य व नियमित अभ्यास करावा असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका चौधरी के डी यांनी केले. सतरा महाराष्ट्र बटालियनची कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष ॲडम ऑफिसर रणदीप सिंग यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.