आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाततून तालुक्यातील दोन रुग्णांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दिड लाख रुपये मंजूर

0
147

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाततून तालुक्यातील दोन रुग्णांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दिड लाख रुपये मंजूर

 

तालुक्यातील साकत येथील भापकर रावसाहेब शाहुराव तसेच देवदैठण येथील उगले शहाजी उतरेश्वर हे अपघातात जखमी झाले होते त्यांच्यावर नगर येथील हाँस्पीटल मध्ये उपचार सुरू होते. दोघाची परिस्थिती हालाखीची असल्याने जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा राम शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा केली आमदार शिंदे यांनी ताबडतोब प्रयत्न करत मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दोन्ही रुग्णांसाठी प्रत्येकी 75 हजार रूपये मदत मिळवून दिली.

वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान दादा मुरूमकर यांच्या प्रयत्नातून जामखेड तालुक्यातील साकत येथील पेंशट रावसाहेब भापकर यांना 75 हजार ची मदत झाली तसेच देवदैठण येथील पेंशट शहाजी उत्तरेश्वर उगले यांना 75 हजार रुपयाची मदत मिळवुन दिल्या बद्दल माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे साहेब व माजी सभापती भगवान मुरुमकर यांचे नातेवाईकांनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here