जामखेड न्युज——
प्रा. विनोद सासवडकर यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश ज्युनियर काँलेजचे
प्रा. विनोद सासवडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे प्रा. सासवडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यशवंत सेना, अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्था, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव व राज्य स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सोहळा सन २०२३ या समारंभामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जुनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री.विनोद सासवडकर यांना सामाजिक ,शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप व प्रमुख उपस्थिती आमदार निलेश लंके, सौ.निलम जाडकर, श्री. कांतीलाल महादेव जाडकर, श्री बाबासाहेब राशींकर, श्रीम .ज्योती उनवणे यांच्या हस्ते प्राध्यापक विनोद सासवडकर यांना पुरस्कार प्रदान करून सपत्नीक सत्कार करण्यात आला.
पुरस्कार प्रमाणपत्र मधील मजकूर
आपण सत्याची कास धरून एक सामान्य कार्यकर्ता समाजोपयोगी राबणारा अशी ओळख कायम ठेवली . आपण छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज , महात्मा जोतीबा फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या साहित्याच्या व विचाराच्या प्रभावातून पुरोगामी चळवळीच्या विचारांची ओळख करून देत आहात . आपण आपले बुध्दी कौशल्य व भारतीय राज्य घटनेतील लोकशाही , समाजवाद , धर्मनिरपेक्षता , राष्ट्रवाद , विज्ञानभिमुकता या पंचसूत्रींना प्राणभूत मानून , जनसेवा राष्ट्रहित जोपासुन सामाजिक समता धृढ करुन निकोप संवर्धनाने आपल्या गावाचे , जिल्हाचे नाव उज्वल केलेत . यापुढेही आपल्या हातून अशीच समाजसेवा , राष्ट्रबांधणी व जातीपातीच्या पलीकडचे मानवधर्माचे कार्य घडावे . या उत्कंठ भावनेने आपणास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हास अभिमान व आनंद होत आहे असा आहे .
या वेळी नागेश विद्यालय स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, पर्यवेक्षक भोजने टी. आर. , प्रा रमेश बोलभट, सासवडकर परिवार उपस्थित होते.
सर्व स्तरातून प्राध्यापक विनोद सासवडकर यांचे अभिनंदन होत आहे.