जामखेड न्युज——
नवरीसाठी पर्समध्ये ठेवलेल्या दागिण्यावर अज्ञात चोरट्याचा डल्ला
शहरातील एका मंगलकार्यालयात आठवड्यात चोरीची दुसरी घटना
शहरातील त्रिमुर्ती मंगलकार्यालयात विवाह सोहळ्यानिमित्त नवरीमुलीसाठी केलेले दागिने ठेवलेली पर्स बगलेत अडकवलेली असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पर्स धारदार शस्त्राने कापून आतील दागिने लंपास केले. लग्नानंतर नवरीमुलीसाठी दागिने देताना दागिने चोरीला गेलेले समजले यामुळे एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे एका आठवड्यात याच मंगलकार्यालयात चोरीची दुसरी घटना आहे. अज्ञात चोरट्याविरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला तशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
शिवदास शामराव उगले वय-47 वर्षे रा. नायगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
दिनांक 30/05/2023 रोजी माझा मोठा मुलगा निखील याचा विवाह समारंभ त्रिमुर्ती मंगल कार्यालय, कर्जत रोड जामखेड, ता. जामखेड येथे आयोजीत केलेला होता. नवरी मुलगी चि. सौ. कां. प्रिती हिचेसाठी आम्ही सोन्याचे दागिणे त्यात एक चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, एक चौदा ग्रॅम वजनाचे मिणीगंठण, आठ ग्रॅम वजनाचे कानातील फुले तसेच दोन भाराचे चांदिच्या जोडव्याचा जोड असे दागिणे केले होते. दिनांक 30/05/2023 रोजी सकाळी 10/00 वा.चे सुमारास मी माझी पत्नी, मुलं, नातेवाईक यांचेसह त्रिमुर्ती मंगल कार्यालय, कर्जत रोड, जामखेड येथे आलेलो होतो.
आम्ही नवरी मुलगी चि. सौ. कां. प्रिती हिचेसाठी बनवलेले दागिणे माझी पत्नी सौ. माधवी हिने तिचेकडील पर्समध्ये ठेवलेले होते. दुपारी 01/30 वा.चे सुमारास माझ्या मुलाचा विवाह समारंभ संपन्न झाला. दुपारी 02/30 वा.चे सुमारास विवाह समारंभामधील धार्मिक विधी पार पडत असताना
माझी पत्नी सौ. माधवी हिने नवरी मुलीसाठी केलेले दागिणे नवरी मुलीला देण्यासाठी तिचे बगले मधील पर्समध्ये ठेवलेले दागिणे काढण्यास गेली असता तिला दागिण्यापैकी एक चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व दोन भाराचे चांदिचे जोडव्याचा जोड दिसले नाहीत. त्यावेळी तिने पर्स तपासून पाहिली असता तिला पर्स कशाचे तरी सहाय्याने फाडलेली दिसली. त्यावरुन आमची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंगल कार्यालयातील गर्दिचा फायदा घेवून माझ्या पत्नीच्या बगलेतील पर्स कशाचे तरी सहाय्याने फाडून तीमध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण व चांदिचे जोडव्याचा जोड स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी चोरून नेले आहेत. चोरीस गेलेल्या दागिण्याचे वर्णन खालीलप्रमाणे.
1)2,00,000/- रुपये किंमतीचे एक चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जु.वा. किं.अं.
2) 1,000/- रु.किंमतीचे दोन भाराचे चांदिचे जोडव्याचा जोड जु.वा.किं.अं.
2,01,000/- एकुण किंमत रुपये तरी दिनांक 30/05/2023 रोजीचे सकाळी 10/00 वा ते दुपारी 02/30 वा.चे दरम्यान त्रिमुर्ती मंगल कार्यालय, कर्जत रोड, जामखेड, ता. जामखेड येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंगल कार्यालयातील गर्दिचा फायदा घेवून माझ्या पत्नीच्या बगलेतील पर्स कशाचे तरी सहाय्याने फाडून तीमध्ये ठेवलेले वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे गंठण व चांदिचे जोडव्याचा जोड स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी चोरून नेले आहेत. म्हणुन माझी अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद आहे.