पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जन्मस्थळ चौंडी येथे आमदार रोहित पवार यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन! अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर करावे – अक्षय शिंदे

0
174

जामखेड न्युज——

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जन्मस्थळ चौंडी येथे आमदार रोहित पवार यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन!

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर करावे – अक्षय शिंदे

विविध नद्यांच्या व बारवांच्या पवित्र तीर्थाने जलाभिषेक करण्यात येणार असून महापूजा व कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. ३० तारखेला रात्री ९ वाजल्यासून ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात आले असून देशभरातून चौंडी येथे येणाऱ्या नागरिकांची राहण्याची व ३१ तारखेला दिवसभर महाप्रसाद वितरणाची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर करावे अशी मागणी जामखेड न्युजशी बोलताना अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी केली आहे.

अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त सकाळी सात वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मभूमीतून आलेला गजराज, घोडे, तसेच टाळकरी यांच्या समवेत ग्रामस्थांसह ३० मे रोजी सायंकाळी चौंडीत यात्रा तसेच विविध नद्यांच्या व बारवांच्या पवित्र तीर्थाने जलाभिषेक करण्यात येणार असून महापूजा व कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे

या वर्षी ३० रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कर्मभूमीतून जन्मभूमीत गजराज आणले आहेत याचबरोबर घोडे, टाळकरी, वारकरी व ग्रामस्थांसमवेत यात्रा काढत महादेव मंदिरात दर्शन घेत अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होणार आहेत. यात अनेक धार्मिक कार्यक्रम राहतील नंतर ३१ रोजी सर्वाना महाप्रसाद दिला जाईल. 

चौकट

अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त चौंडीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येत आहेत तेव्हा अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर करण्यात यावे अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here