गजराज, घोडे, टाळकरी यांच्या समवेत यात्रा काढणारच – आमदार रोहित पवार यंदाही संघर्षांची चिन्हे, प्रशासनाने रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

0
264

 

जामखेड न्युज——

गजराज, घोडे, टाळकरी यांच्या समवेत यात्रा काढणारच – आमदार रोहित पवार

यंदाही संघर्षांची चिन्हे, प्रशासनाने रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त सकाळी सात वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मभूमीतून आलेला गजराज, घोडे, तसेच टाळकरी यांच्या समवेत ग्रामस्थांसह ३१ मे रोजी सकाळी चौंडीत यात्रा काढणारच असा निश्चय आमदार रोहित पवार यांनी चौंडीत पत्रकार परिषदेत केला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ मे रोजी चौंडी (ता. जामखेड) येथे होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यामुळे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तरीही ग्रामस्थ व ग्रामपंचायत च्या यात्रेत सहभागी होणारच आमचा शासकीय कार्यक्रमाला पाठिंबा आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्याअगोदर आमचा कार्यक्रम संपेल असेही आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार रोहित पवार यांच्या यात्रेला प्रशासनाने परवानगी नाकारली यामुळे आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, सुरेश भोसले, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, माजी सभापती सुधीर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, प्रकाश सदाफुले, सरपंच सुनील उबाळे नगरसेवक दिगंबर चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वर्षी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कर्मभूमीतून जन्मभूमीत गजराज आणले आहेत याचबरोबर घोडे, टाळकरी, वारकरी व ग्रामस्थांसमवेत यात्रा काढत महादेव मंदिरात दर्शन घेत अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होणार आहेत. यात अनेक धार्मिक कार्यक्रम राहतील नंतर सर्वाना महाप्रसाद दिला जाईल आमचा कार्यक्रम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येण्याच्या अगोदर आमचा कार्यक्रम संपेल तरी प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी

          याही वर्षी संघर्षाची चिन्हे!!!

आमदार रोहित पवार यांच्या यात्रेला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे तरीही दरवर्षी प्रमाणे यात्रा काढणारच असा निश्चय केला आहे यामुळे याही वर्षी सत्ताधारी व विरोधक यांच्यात पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.

 

परवानगी नसताना भाजपानेही घेतली होती जाहीर सभा

 

गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार होते तर भाजपा विरोधी पक्षात होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने भाजपाला परवानगी नाकारली होती. तरीही शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर गोपीचंद पडळकर व आमदार प्रा. राम शिंदे यांची जाहीर सभा झाली होती. या वर्षी उलटी परिस्थिती आहे सत्ताधारी भाजपा तर विरोधात महाविकास आघाडी सरकार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here