जामखेड न्युज——
दरडवाडी येथील शेतकऱ्याच्या दोन्ही मुलींची मुंबई पोलीस दलात निवड
परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील अशोक दराडे या गरीब शेतकऱ्याच्या लक्ष्मी दराडे, चतुर्थी दराडे
या दोन्ही मुलींची मुंबई पोलीसांत निवड झाली आहे
ग्रामीण भागातील पोलीसांत भरती होणाऱ्या मुलींसाठी हा एक आदर्श आहे.
याबाबत माहिती अशी की ,खर्डा ग्रामपंचायत हद्दीतील दरडवाडी येथील अशोक दराडे या गरीब शेतकऱ्याच्या कु.लक्ष्मी दराडे,कु.चतुर्थी दराडे या दोन मुलींना मोठ्या कष्टाने उभे केले. त्यांनीही आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून मोठे परिश्रम घेतले व रांनिग,विविध प्रकारचे व्यायाम करून या दोन्ही मुली मुंबई पोलीस दलात त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे दरडवाडी सहित खर्डा परिसरात या दोन्ही मुलींचे अभिनंदन करण्यात येत आहे.
खऱ्या अर्थाने अंगामध्ये जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याचा दृढनिश्चय केल्यानंतर गरीब कुटुंबातील मुले सुद्धा या पदापर्यंत पोहचू शकतात हे या दोन मुलींच्या पोलीस दलात झालेल्या नियुक्तीमुळे पहावयास मिळाले आहे.
या दोन्ही भगिनींना ज्यांनी व्यायाम शिक्षण व आर्थिक शिक्षणासाठी मदत केली त्या सर्वांनी दरडवाडी येथे जाऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला आहे.
यावेळी कॅप्टन लक्ष्मण भोरे,प्रा. रमेश पाटील, दगडू थोरात, जोरे सर, कॅप्टन गौतम केळकर,एन.सी.सी.चे दराडे सर व दरडवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.