जामखेड न्युज—–
शिऊर येथील पोलीस दलात भरती झालेल्यांचा ज्ञानभैरव वाचनालयात सन्मान सोहळा
शिऊर येथील पाच जणांची पोलीसांत भरती
तालुक्यातील शिऊर येथील चार युवक व एका मुलगी मुंबई पोलीसांत भरती झाले आहेत या पाचही यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान गावातील ज्ञानभैरव वाचनालयात करण्यात आला. तालुक्यातील पोलीस भरती होऊ इच्छिणाऱ्या तरूण तरूणी पुढे हा आदर्श आहे.
शिऊर येथील रहिवासी व शहरातील भरती पुर्व प्रशिक्षण देणारी नामांकित शिवनेरी अकॅडमी यांच्या येथे प्रशिक्षण घेऊन पोलीस दलात भरती झालेल्या तरूणांचा शिऊर येथील ज्ञानभैरव वाचनालय येथे सन्मान सोहळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
येथील शारदा ज्योतीराम फाळके, पांडुरंग कल्याण तनपुरे, नाना नवनाथ तनपुरे, हरिभाऊ आश्रु माने, शंकर आश्रु क्षीरसागर हे सर्व शिऊर मधील मुंबई पोलीस भरती झालेले आहेत.
यावेळी सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून जामखेड पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव देवकाते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवनेरी अकॅडमीचे संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मणराव भोरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल बडे,उपनिरिक्षक अनिलराव भारती, पोलीस नाईक अजय साठे, अंमलदार देवा पळसे, केंद्र प्रमुख मुकुंदराज सातपुते, मेजर विजय नागरगोजे, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष यादवराव देवकाते, बाजार समितीचे संचालक विठ्ठल चव्हाण, ग्रा.पं. स. व सोसाटीचे संचालक बदाम निंबाळकर, बापू पिंपरे, सोसाटीचे अनिल क्षिरसागर, अंगद देवकाते, विठ्ठल देवकाते, भास्कर फाळके, महेश राऊत, मेजर क्षिरसागर, दादा निकम,भिकु समुद्र, बाळासाहेब लटके, श्रीराम कडू, विष्णू तनपुरे, प्रविण मुटके, आबा गाडे, तनपुरे मेजर, नाना तनपुरे, साहेबराव देवकाते, रघुनाथआबा तनपुरे, लक्ष्मण गाडे, आकाश निकम, रविंद्र निकामी, बाळू निकम, अशोक निकम, हरिभाऊ साखरे, बप्पा साखरे, आबासाहेब वीर, लिंगाजी देवकाते, नाना सावंत, महादेव झरकर, बाळासाहेब राऊत व समस्त ग्रामस्त शिऊर उपस्थित होते.
यावेळी पांडुरंग तनपुरे, नाना नवनाथ तनपुरे, हरिभाऊ माने, शंकर क्षीरसागर, विजय तनपुरे, करण जनार्धन समुद्र, शारदा फाळके, अंजली शिंदे, लक्ष्मी दराडे, चतुर्थी दराडे, कल्पना सुळ, इंगळे शिवानी, या सर्वांचा आई – वडीलांसोबत भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी एकनाथ चव्हाण, लहु दराडे, अंजली शिंदे, आशाताई फाळके, मुकुंदराज सातपुते, कॅप्टन लक्ष्मण भोरे, सुनील बडे साहेब, अनिलराव भारती बबनराव देवकाते यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गहिनींनाथ इंगवले यांनी तर आभार आबासाहेब वीर सर यांनी मानले.