जामखेड न्युज——
दोन खासदार व एका आमदाराला राम शिंदेच भारी- सभापती शरद कार्ले
बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांचा पदग्रहण समारंभ संपन्न
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एका बाजूला दोन खासदार एक आमदार तसेच जिल्हा बँकेचे संचालक तर दुसऱ्या बाजूला आमदार प्रा. राम शिंदे पण यात शिंदेच भारी ठरले आहेत. दोन्ही गटाला समसमान नऊ नऊ जागा मिळाल्या जनतेच्या आशिर्वादाने ईश्वर चिठ्ठीने आपल्याला साथ दिली यामुळे दोन खासदार एक आमदार व संचालक यांना आमदार प्रा राम शिंदेच भारी ठरले आहेत.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीत सभापती शरद कार्ले यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला यावेळी यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, रवी सुरवसे, ज्योती क्रांती पतसंस्थेचे चेअरमन आजीनाथ हजारे, अमित चिंतामणी, तुषार पवार, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पाचारणे, बिभीषण धनवडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जरे, विनोद नवले, बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद सह नऊ संचालक सभापती शरद कार्ले, गौतम उतेकर, सचिन घुमरे, विष्णू भोंडवे,गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, नंदकुमार गोरे,सिताराम ससाणे, रविंद्र हुलगुंडे यांच्या सह मनोज कुलकर्णी, लहू शिंदे, अंकुश शिंदे, महेंद्र बोरा, प्रा. कैलास माने, नागराज मुरूमकर, अँड संजय पारे, अभिजीत राळेभात, संजय कार्ले, प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे, प्रविण चोरडिया, शहाजीराजे भोसले, राहुल उगले, सलीम बागवान, संपत राळेभात, बापुराव ढवळे, अँड बंकट बारवकर, गोरख घनवट, ठेकेदार राजू देशपांडे, बाळूशेठ बोथरा, श्रीराम डोके, ज्ञानेश्वर झेंडे, संदीप गायकवाड, अशोक देवकर, तात्याराम पोकळे, तुषार पवार, अँड प्रविण सानप, भारत उगले, दादासाहेब वारे, मच्छिंद्र गीते, भरत जगदाळे, ऋषी मोरे यांच्या सह शेतकरी व्यापारी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनियुक्त सभापती शरद कार्ले म्हणाले की, मतदारांनी टाकलेल्या विश्वासाचा तडा जाऊ दिला जाणार नाही. आमदार प्रा. शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी व्यापारी हिताचे निर्णय घेत जामखेड बाजार समितीचा राज्यात कसा लौकिक होईल हे पाहिले जाईल.
बाजार समितीत मुलभूत सुविधा बरोबरच अंतर्गत रस्ते, शौचालय, शेतकरी निवास व कांदा मार्केट उभारणी करण्यात येईल. विश्वास सार्थ ठरेल असे काम करू असे सभापती शरद कार्ले यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार बापुराव ढवळे यांनी मानले