बील मागितल्याच्या कारणावरून हॉटेल सहारा येथे पाच जणांच्या टोळक्यांकडून राडा, वेटरला मारहाण

0
163

जामखेड न्युज——

बील मागितल्याच्या कारणावरून हॉटेल सहारा येथे पाच जणांच्या टोळक्यांकडून राडा, वेटरला मारहाण


दारू व जेवनाचे बील मागितल्याचा राग आल्याने जामखेड नगर रोडवरील हॉटेल सहारा येथे पाच जणांकडून राडा करत दोन वेटरला मारहाण, साहित्याची मोडतोड करण्यात येऊन जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी जामखेड येथील पाच जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.


याबाबत हाॅटेल सहाराचे मॅनेजर बालाजी नामदेव रसाळ (वय ३६ वर्षे) धंदा. हॉटेल व्यवसाय रा. रसाळनगर जामखेड.यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी जामखेड शहरातील नगर रोड येथील हॉटेल सहारा येथे सुमारे ५ वर्षापासून हॉटेल मॅनेजर म्हणुन नोकरी करुन माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. हॉटेल सहारा मध्ये १) जितेश रमेश सदाफुले रा. सदाफुले वस्ती, जामखेड ता. जामखेड २) ओकार भरत समुद्र रा. खुरदैठण ता. जामखेड हे वेटर म्हणुन कामास आहेत. काल दि. १२ मे रोजी रोजी सायंकाळी ६:३० वाजताचे सुमारास मी हॉटेल सहारा येथे येवुन काऊंटरवरील खुर्चीवर बसुन हॉटेलचे नियोजन पाहत असताना दोन अनोळखी इसम हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले व हॉलमध्ये बसलेले असताना त्यांनी दारू पिण्यासाठी दारुची ऑर्डर दिली होती.

त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास मी काऊंटरवर बसलेलो असताना हॉटेल मधील वेटर ओंकार समुद्र हा त्या दोन अनोळखी इसमाजवळ जावुन त्यांना म्हणाला की, तुम्ही हॉटेलचे बील पेड केले आहे का असे विचारले असता त्याचा राग आल्याने त्यांनी आमचे वेटर ओंकार समुद्र व मला शिवीगाळ दमदाटी केली होती. व त्यानंतर त्यांनी त्यांचे मोबाईल फोनवरुन कोणाला तरी फोन करुन हॉटेल सहारा येथे बोलावुन घेतले होते. त्यानुसार आलेल्या ३ अनोळखी इसम (नाव पत्ता माहीत नाही) हे आमचे हॉटेल सहारामध्ये अचानक येवुन त्यांनी मला व आमचे वेटर जितेश सदाफुले व ओंकार समुद्र व तसेच आमचे हॉटेल मध्ये आलेला माझा मेव्हणा किशोर नंदु मोहीते रा. पोकळेवस्ती, जामखेड असे आम्हाला शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन आमचे हॉटेलमध्ये काचेच्या बॉटल फोडल्या व आमचे हॉटेलचे काउंटवरील बरण्या जमीनीवर पाडुन त्यामधील खडीसाखर व बडीशेप जमीनीवर ओतुन नुकसान केले व भांडणात माझे गळ्यातील सोन्याची चैन तुटुन जमीनीवर पडुन गहाळ झाली आहे त्यानंतर ते सर्वजण आम्हाला म्हणाले की, तुम्ही जर आमचे विरुध्द पोलीसात तक्रार दिली तर तुम्हाला आम्ही पाहुन घेवु असे म्हणुन तुम्ही हॉटेलचा धंदा कसा करायचा तेच आम्ही पाहतो असे म्हणुन ते सर्वजण आमचे हॉटेल मधुन बाहेर निघुन गेले.


त्यानंतर मला आमचे हॉटेलमध्ये काम करणारा वेटर ओंकार समुद्र याचेकडुन मला आम्हाला मारहाण करणारे वरील अनोळखी इसमांपैकी 1) आकाश पिंपळे 2) ओम राळेभात दो.रा. राळेभात गल्ली, जामखेड ता. जामखेड 3) श्रीकृष्ण शिंगणे रा. मोरे वस्ती, जामखेड ता. जामखेड 4) पवन राजगुरु 5) सुयोग पांडव दोघेही रा. सुतार गल्ली, जामखेड ता. जामखेड असे त्यांची नावे असल्याचे
समजले

आमचे हॉटेलमधील वेटर ओंकार समुद्र याने आमचे हॉटेलमध्ये आलेल्या सुयोग पांडव याचेकडे हॉटेलचे बिल मागीतल्याचा त्यास राग आल्याने त्याने व त्याचे सोबत असलेला ओम राळेभात याने आम्हाला शिवीगाळ दमदाटी करुन सुयोग पांडव याने त्याचे मोबाईलवरुन दुस-या मुलांना फोन करुन त्याने 1) आकाश पिंपळे राळेभात गल्ली, जामखेड ता. जामखेड 2) श्रीकृष्ण शिंगणे रा. मोरे वस्ती, जामखेड ता. जामखेड 3) पवन राजगुरु रा. सुतार गल्ली, जामखेड ता. जामखेड यांना बोलावुन घेवुन गैर कायदयाची मंडळी जमवुन मला व आमचे हॉटेलमधील वेटर ओंकार समुद्र व जितेश सदाफुले यांना शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. व भांडणात माझे गळयातील सोन्याची चैन तुटुन पडुन गहाळ झाली आहे. त्यानंतर ते सर्वजण आम्हाला म्हणाले की, तुम्ही जर आमचे विरुध्द पोलीसात तक्रार दिली तर तुम्हाला आम्ही पाहुन घेवू असे म्हणुन तुम्ही हॉटेलचा धंदा कसा करायचा तेच आम्ही पाहतो अशी धमकी दिली यावरून फिर्यादी बालाजी नामदेव रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) आकाश पिंपळे २) ओम राळेभात दो.रा. राळेभात गल्ली, जामखेड ३) श्रीकृष्ण शिंगणे रा. मोरे वस्ती, जामखेड ४) पवन राजगुरु ५) सुयोग पांडव दोघेही रा. सुतार गल्ली, यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय लोखंडे व पोलीस नाईक अजय साठे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here