अनाधिकृत लाईटचा आकडा कट केल्याच्या रागातून वायरमनला मारहाण, एक जणाविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
थकीत वीज बील वसुली तसेच परिसरातील अनाधिकृत लाईटचे आकडे कट करून अधिकृत वीज मीटर घ्यावे म्हणून काम करत असताना साकत मध्ये अनाधिकृत लाईटचा आकडा का काढला म्हणून वायरमनला मारहाण करण्यात आली आहे तशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. एक जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकत येथे वायरमन म्हणून कार्यरत असलेले रमेश दिलीप सावंत वय 25 वर्षे धंदा नोकरी (विद्युत सहाय्यक महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी) रा.सावंतवाडी पोस्ट. नळेगाव ता. चाकुर जि.लातुर हल्ली रा. 33/11 के. व्ही. उपकेंद्र जामखेड, विद्युत भवन भुतवडा रोड जामखेड, ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी मार्च -2024 महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मध्ये विद्युत सहाय्यक या पदावर जॉईन झालो आहे.
मी सुमारे सप्टेंबर 2024 पासुन उपविभाग जामखेड ता. जामखेड येथे कार्यरत असुन जामखेड शहर कक्ष अंतर्गत साकत, कोल्हेवाडी,पिंपळवाडी, कडभणवाडी या गावांचा कार्यभार आहे. त्यामुळे लाईनची देखभाल व विज बील वसुली करणे तसेच अनाधिकृत विज वापर आकडा काढण्याचे कामकाज करत आहे.
दिनांक-11/02/2025 रोजी मी व प्रशिक्षणार्थी ज्ञानेश्वर पोटे असे साकत गावात ता. जामखेड येथे जाऊन गावातील अनाधिकृत असलेले सर्व आकडे आम्ही कट केले होते. तसेच विजबील वसुली व रोहित्राचे देखभालीचे काम केले होते. दिनांक- 13/02/2025 रोजी सकाळी 08/40 वा. चे सुमारास मी व प्रशिक्षणार्थी ज्ञानेश्वर पोट असे साकत येथे आमचे दैनंदिन कर्तव्यावर विजबील वसुली व अनाधिकृत आकडे काढण्यासाठी गेलो असता तेथे शिवाजी रामभाऊ मुरुमकर रा. साकत ता. जामखेड हा आला व आम्ही दिनांक- 11/ 02/ 2025 रोजी आकडे कट केल्याचा मनात राग धरुन मी विद्युत सहाय्यक (वायरमन) माहित असताना सुध्दा माझ्या गालावर चापटीने मारहान करून शिवीगाळ करुन तुला काय करायचे ते कर तुला बघुन घेतो अशी धमकी दिली.
मी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. म्हणुन माझी शिवाजी रामभाऊ मुरुमकर रा. साकत ता.जामखेड जि.अहिल्यानगर यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. असे म्हटले आहे.
वायरमनला मारहाण यामुळे साकत परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काँन्टेबल जितेंद्र सरोदे करत आहेत.