जामखेड न्युज——
शेतातील बांधावरून जाण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी सात जणांवर गुन्हा दाखल
पाच वर्षांत दुसऱ्यांदा भांडणे
जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे आमच्या शेतातून का गेलात म्हणून सात जणांकडून तिघांना लोखंडी खोरे, केबल, लोखंडी गज यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. हे तिनही जखमी खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी हे राजकीय पार्श्वभूमीवर असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
काल दि. १२ मे रोजी दुपारी १२: २० वाजताचे सुमारास आगी गावाचे शिवारातील शेत गट नंबर १४२ मधील अनिल तुकाराम ढवळे (वय ४९) वर्षे व कुटुंबातील इतर सदस्य हे त्यांचे शेतातील ऊसाला खत टाकण्याकरिता रासायनिक खताच्या गोण्या घेऊन घटनेतील आरोपी सुशांत किसन ढवळे यांचे शेताचे कडेने गेल्याचा राग येऊन आरोपी १) सुशांत किसन ढवळे २) धनंजय किसनराव ढवळे ३) आकाश सुशील ढवळे ४) किसनराव दगडू ढवळे ५) प्रतीक धनंजय ढवळे ६)अनिता सुशील ढवळे ७) माधुरी धनंजय ढवळे यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून अनिल तुकाराम ढवळे यांचे जवळ जाऊन फिर्यादीस शिवीगाळ करून म्हणाले की तुम्ही आमचे शेतातून का आले असे म्हणून आरोपी क्रमांक १ याने त्याचे हातातील लोखंडी खोरे तुंब्याकडून फिर्यादीचे डोक्यात डाव्या बाजूस जीव घेण्याचे उद्देशाने मारून गंभीर दुखापत केली व आरोपी नंबर चार हे येथील इतर सर्व आरोपींना म्हणाले की यांना आज जीवच मारून टाका असे म्हणून आरोपी क्रमांक ४ याने फिर्यादीस त्याचे हातातील लोखंडी गजाने फिर्यादीचे डावे हातावर, बरगडीवर मारहाण केली.
त्यावेळी फिर्यादीची पत्नी सविता व मुलगा विशाल असे फिर्यादीस सोडविण्यासाठी मध्ये आले असता मुलगी अस्मिता ही तिचे कडील मोबाईल मध्ये शूटिंग करू लागली असता फिर्यादीचा मुलगा विशाल यास आरोपी क्र. ३ याने त्याचे हातातील खोरे तुंब्याकडून उजव्या खांद्यावर मारले तसेच आरोपी क्र. ४ याने त्याचे हातातील गजाने दंडावर व छातीवर मारहाण केली तसेच फिर्यादीची पत्नी सुनीता हीच आरोपी क्र ५ याने लोखंडी गजाने डोक्यात, नाकावर डाव्या, हातावर मारहाण केली त्यावेळी फिर्यादी यांची मुलगी अस्मिता ही मोबाईल मध्ये शूटिंग करीत असताना आरोपी क्र. ६ व ७ यांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचे हातातील मोबाईल खाली जमिनीवर पडून दिला व आरोपी क्र. १ ते २ यांनी तिथून जाताना फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून म्हणाले की तुम्ही आमचे नादी लागले तुम्हाला याचा शेतात मारून पुरून टाकू अशी धमकी देऊन तिथून ते सर्वजण निघून गेले आहे.
यानुसार फिर्यादी अनिल तुकाराम ढवळे (वय ४९ वर्षे) धंदा -शेती रा. हळगाव हे जामखेड शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना नोंदविण्यात आलेल्या जबाबदावरून आरोपी १) सुशांत किसन ढवळे २) धनंजय किसनराव ढवळे ३) आकाश सुशील ढवळे ४) किसनराव दगडू ढवळे ५) प्रतीक धनंजय ढवळे ६)अनिता सुशील ढवळे ७)माधुरी धनंजय ढवळे सर्व रा.हळगाव ता. जामखेड यांचे विरुद्ध भादवि कलम 307, 324, 323, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. या घटने फिर्यादी अनिल तुकाराम, विशाल अनिल ढवळे, सविता अनिल ढवळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.