जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
तालुक्यातील साकत येथील उत्तम मार्तंड लहाने (वय ८५)
याचे हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी साकत येथे सकाळी नऊ वाजता झाला उद्या शुक्रवारी सकाळी आठ वाजता सावडण्याचा कार्यक्रम होणार आहे.
उत्तम लहाने हे कै. विनायकराव देशमुख विद्यालय ईट ता. भूम येथील मुख्याध्यापक सुरेश लहाने व साकत ग्रामपंचायत मधील लिपीक सतिश लहाने यांचे वडिल होत. त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.