आमदार रोहित पवार यांचे जिल्हा बँकेच्या संचालकापुढे लोटांगण – रवी सुरवसे

0
122

जामखेड न्युज—–

आमदार रोहित पवार यांचे जिल्हा बँकेच्या संचालकापुढे लोटांगण – रवी सुरवसे

 

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांला किंवा कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर अन्याय करून आ. रोहित पवार यांनी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्यापुढे लोटांगण घालत सोसायटी मतदारसंघातील सर्व ११ जागा त्यांना दिल्या आहेत. कारण कर्जत मध्ये आ राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा केला त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी उमेदवारी केली आहे. तसेच कर्जत तालुक्यातील आर्धी राष्ट्रवादी काँग्रेस आ. राम शिंदे यांच्या बरोबर आहे त्यामुळे कर्जत बाजार समिती निवडणूक आ. रोहित पवार यांना मोठ्या अडचणी सामना करावा लागत आहे आणि कर्जत बाजार समिती आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही अशी भिती वाटत असल्याने त्यांनी सर्व जागा जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात यांना दिल्या आहेत.

जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भारतीय जनता पार्टीने आ. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. अशाच एका ठिकाणी बोलताना भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवी सुरवसे हे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, गेली पंधरा वर्षापासून आपण आ. राम शिंदे यांचे राजकारण पाहतोय. तालुक्यात त्यांनी कधीही कोणाला त्रास दिला नाही किंवा अपमान केला नाही. जो कोणी येईल त्याचे काम करण्याची चांगली पद्धत त्यांनी वापरली आहे. मात्र या उलट गेल्या अडीच वर्षात व भाजपचे सरकार येण्यापूर्वी आ. रोहित पवार कोणालाही मानसन्मान देत नव्हते. कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता दादागिरीचे राजकारण त्यांच्याकडून केले जात होते. मात्र आपले सरकार आले तसेच आ. राम शिंदे यांना आमदारकी मिळाली तेंव्हापासून आ. रोहित पवार यांची कार्यकर्त्यांशी वागण्याची पद्धत बदलली असली तरी मागील दोन अडीच वर्षात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलाच पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला. तरीही भाजपचा कोणताही कार्यकर्ता पक्षाला किंवा शिंदे साहेबांना सोडून गेला नाही. त्यामुळेच आपण जर पाहिले तर या निवडणुकीच्या प्रचारात खूप मोठी आघाडी घेतलेली आहे. तर आ. रोहित पवार यांच्या पॅनलमध्ये मोठी फुट पडली आहे. कारण त्यांच्या पॅनलच्या सोसायटी मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राळेभात बंधू तर ग्रामपंचायत मतदार संघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते फिरत आहेत.


आमदार राम शिंदे साहेबांनी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्याशी युती करण्यासंदर्भात बोलनी केली होती मात्र. त्यांना पाच वर्ष सभापती पद द्यावे लागेल अशी त्यांची अट होती. परंतु शिंदे साहेबांनी सांगितले की अडिच अडिच वर्ष सभापती पद वाटुन घ्यावे लागेल. व पहिले अडिच वर्ष भाजपाचाच सभापती राहिल. ही अट त्यांना मान्य नव्हती व त्यांना पाच वर्षासाठी सभापती पद पाहिजे होते. जिल्हा बँकेचे संचालक पद, बाजार समिती सभापती पद, खरेदी विक्री संघाचे चेअरमन पद त्यांनाच पाहिजे. म्हणजे तालुक्यातील सहकारी संस्थांची प्रमुख पदं त्यांना त्यांच्या घरातीलच माणसांना पाहिजेत. अशी तीन तीन प्रमुख पदं आपल्या घरातच पाहिजे असतील तर त्यासाठी मोठे योगदान द्यायला पाहिजे. जनतेचे त्यांना काही देणे घेणे नाही. तालुक्यातील सहकारातील सर्व पदांवर त्यांना आपल्या घरातील माणसे पाहिजेत म्हणून त्यांच्यात आणि आपल्यात जमलं नाही.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांच्याकडून जी दादागिरी केले जाते. कुठल्याही सेवा संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनला बँकेत बोलावून घेऊन सांगितले जाते की, तुमचे प्रकरण केले जाणार नाही. तुमच्या संस्थेचे वाटप होऊ देणार नाही. या पद्धतीची दादागिरी त्यापुढे कोणीही खपवून घेऊ नका. कारण जिल्हा बँकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. अध्यक्ष म्हणून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आहेत त्यामुळे काही जरी सांगितलं तरी कोणत्याही सोसायटीचे प्रकरण किंवा वाटतं त्या ठिकाणी थांबणार नाही. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. त्यासाठी आपले नेते शिंदे साहेब खंबीर आहेत.

ज्या पद्धतीने आ. रोहित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गोळ्या-बिस्कीटे व पॅड वाटून मत घेतली. तीच पध्दत आता हळगावचा साखर कारखाना विकत घेऊन ज्यांना बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी देता आली नाही. त्या पंधरा लोकांची त्या कारखाना समितीवर नेमणूक केली आहे. म्हणजे पुन्हा गाजर दाखवले गेले आहे. २०१९ ला नादी लागून मतं घेतली तशीच मते आता आपल्याला घेता येतील. असंच आ. रोहित पवार यांना वाटत आहे. परंतु तालुक्यातील वातावरण पाहिले तर संपूर्ण तालुक्यात भारतीय जनता पार्टीवर व आ. राम शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून छत्रीच्या चिन्हावर उभे असलेल्या सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. आपल्याला आपल्या संचालक पुन्हा निवडून द्यायचे आहेत.

आ.रोहित पवार आमदार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बोलण्याची ताकद नव्हती परंतु त्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे विरोधात आपले आमदार राम शिंदे साहेब करताना तो भाजपचा कार्यकर्ता असेल याची काळजी घेतली आणि त्याच कार्यकर्त्यांना निवडणुकीला उमेदवारी दिली व त्यांनाच ताकद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here