जामखेड न्युज——
लोकमान्य हाँस्पिटल सामाजिक बांधिलकी जपत आहे- रमेश गुगळे
लोकमान्य हाँस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचा १५० रूग्णांनी घेतला लाभ

लोकमान्य हाँस्पिटल सामाजिक बांधिलकी जपणारे हाँस्पिटल आहे. अनेक गोरगरीब लोकांना फायदा होत आहे. शिबिराच्या माध्यमातून शेकडो रूग्णांना फायदा झाला आहे असे मत प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे यांनी व्यक्त शहरातील लोकमान्य व्हाँस्पीटल मध्ये मंगळावर दि. २५ रोजी भव्य मोफत अस्थिरोग, बी. पी., शुगर, हृदयरोग व पोटाचे विकार आणि मुळव्याध मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यात सुमारे १५० रूग्णांनी लाभ घेतला आहे.

लोकमान्य हाँस्पिटल मध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी सह सर्व प्रकारच्या हाडांचे फॅक्टर मणके विकार हात व पायांना वारंवार मुंग्या येणे जुनाट संधिवात, बीपी, शुगर हृदयरोग, पोटाचे विकार, हर्निया, मुळव्याध (मुळव्याधीवर आधुनिक स्टेपलर पद्धतीने उपचार ) शिबीरात १५० रूग्णांनी उपचाराचा लाभ घेतला
प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे यांच्या शुभहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी हॉस्पिटल चे संचालक डॉ. भुपेंद्र पन्हाळे, डॉ. रोहन टोमके, डॉ. सचिन काकडे, डॉ. महादेव पवार, डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ. जतीनबोस काजळे, डॉ. पांडूरंग सानप, डॉ. संजय राऊत, डॉ. सुनिल वराट, डॉ. अशोक बांगर, डॉ.नानासाहेब बोलभट, डॉ. गफ्कार शेख, प्रकाश डोके, सचिन जाधव यांच्या सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, लोकमान्य हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिना निमित्त सामाजिक बांधिलकी जपत तसेच रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याप्रमाणे 50% सवलतीच्या दरात ऑपरेशन व औषधे हे गरजू रुग्णांसाठी शिबीर लाभदायक तसेच सर्व सोययुक्त व तज्ञ डॉक्टर रुग्णांची काळजी घेत उपचार करण्यात आले
या शिबीरामध्ये आस्थिरोग,बी. पी., शुगर, हृदयरोग व पोटाचे विकार आणि मुळव्याध उपचार करण्यात आले विशेष म्हणजे या शिबीरात ५०% सवलतीच्या दरात ऑपरेशन करण्यात आले तसेच ५०% सवलत औषधांवर देण्यात आले.१५० रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. तसेच ५ रुग्णांचे ऑपरेशन झाले असून उपचार घेत आहेत. अशी माहिती हाँस्पिटल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली
शिबीराच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य हॉस्पिटल सर्व स्टाफ, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
–




