कालिका पोद्दार लर्न स्कुल मध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा प्रा. लक्ष्मीकांत खिची देणार स्वसंरक्षणाचे धडे

0
127

जामखेड न्युज—–

कालिका पोद्दार लर्न स्कुल मध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा

प्रा. लक्ष्मीकांत खिची देणार स्वसंरक्षणाचे धडे

जामखेड शहरातील कालिका पोद्दार लर्न स्कुल मध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा शनिवार दि. २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेसाठी तंज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर लक्ष्मीकांत खिची सर असणार आहेत तरी परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.

प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर लक्ष्मीकांत खिची सर हे Zee अनन्य पुरस्काराने सन्मानित आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी महिलांना स्वसंरक्षण धडे दिले आहेत. महिलांना स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरणार आहे. संरक्षण तंत्रांची माहिती दिली जाईल त्याशिवाय महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्यात महिलांशी संबंधित कायद्यांबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शनिवार दि. २९ रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत कालिका पोद्दार लर्न स्कुल साकत फाटा जामखेड येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे महिलांना जाणे येण्यासाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तपनेश्वर रोड, नगररोड, पोलीस स्टेशन रोड, बीड रोड, संताजी, शिवाजी नगर येथे बस उपलब्ध असतील. महिलांनी पाणी बाँटल व योगा मँट बरोबर ठेवावी सर्वासाठी मोफत प्रवेश आहे.
नावनोंदणी साठी 9697591414 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

परिसरातील महिलांसाठी हि सुवर्ण संधी आहे तरी स्वसंरक्षण कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here