जामखेड न्युज——
श्री. स्वामी अमृत भारती विद्यालयाची इंटर नॅशनल रंगोत्सव आर्ट कॉम्पीटीशन मध्ये गरुड झेप!
जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत अर्चना जाधवचा तृतीय क्रमांक
श्री स्वामी अमृत भारती विद्यालयाची विद्यार्थिनी रंगोत्सव सेलिब्रिशन ऑर्गनायझेशन फॉर नॅशनल लेवल आर्ट कॉम्पीटीशन मुंबई – महाराष्ट्र द्वारा आयोजित राष्ट्रीय रंगोत्सव आर्ट कॉम्पीटीशन स्पर्धेमधून १३ विद्यार्थी आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरले होते . उत्तीर्ण विद्यार्थ्यास स्मृती चिन्ह,मेडल व प्रमाणपत्र देवून या संस्थेमार्फत गौरविण्यात आले होते.
बीड जिल्ह्यासाठी जागतिक रंगोत्सव आर्ट कॉम्पीटीशन स्पर्धा परीक्षासाठी श्री स्वामी अमृत भारती विद्यालय पिंपळवंडी परीक्षा केद्र म्हणून मान्यता दिली . त्यानुसार बीड जिल्ह्यातील काही विद्यालयातील विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय रंगोत्सव आर्ट कॉम्पीटीशन स्पर्धा परीक्षा या केद्रावर दिली हिती. या परीक्षा केंद्रामध्ये श्री.स्वामी अमृत भारती मा.व उच्च मा.विद्यालयाच्या १३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
जेव्हा या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय रंगोत्सव आर्ट कॉम्पीटीशन स्पर्धेचा निकाल दोन पार्सलमध्ये पाठवून कळवण्यात आला.निकालासह यशस्वी विद्यार्थ्यांना मानचिन्ह,अवार्ड,प्रमाणपत्रे पाठविण्यात आली होती.
त्यानुसार या स्प्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा सोमवार दि.२८/०३/२०२३ या दिवशी संपन्न झाला.
कु.अर्चना सतिश जाधव या विद्यार्थिनीने जागतिक हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवले
स्मार्ट वॉच, प्रमाणपत्र मेडल देवून गौरव करण्यात आला.
नंतर स्पेकट्याक्युलर अवार्ड विजेते विद्यार्थी
१) पवार भाग्यश्री रमेश ५ वी कलरिंग
२) जायभाये भाग्यश्री भिवा १२ वी स्केचिंग
इमाजिंन युथ आर्टिस्ट अवार्ड विजेते
१) बांडराव सृष्टी बापूराव – ५ वी कलरिंग
२) लाड नेत्राली अमोल – ५ वी कोलाज मेकिंग
३) पवार प्रियंका धर्मराज -७ वी कलरिंग
४) फुलमाळी स्वप्नील रावसाहेब – ७ वी हॅन्डरायटिंग
५) पवार प्रतीक्षा हरिदास -८ वी कलरिंग
६) वाल्हेकर अंजली सुरेश – ९ वी कलरिंग
७) पवार प्रियंका नानासाहेब -१० वी कोलाज मेकिंग
१०) पवार पायल धर्मराज – १० वी वी स्केचिंग
कन्सोलेशन अवार्ड
१) राऊत शिवानंद प्रशांत – ८ वी स्केचिंग
२) पवार अथर्व बापूराव -१० वी हॅन्डरायटिंग
विद्यार्थ्याच्या कला विषयातील आवड व कलात्मक गुणांना संधी देण्याचे कार्य आर्ट मास्टर श्री.बांडराव सर व मु.अ.अशोक पवार सर यांना व शाळेला ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
नेत्रदीपक विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय सिलेब्रिशन आर्ट कॉम्पीटीशन भव्य दिव्य यश प्राप्त केले.हे यश प्राप्त केल्याने संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान पिंपळवंडी ) संस्थेचे सचिव ह.भ.प.परमानंद भारती महाराज श्री.पवार पी.बी, मु.अ.पवार, ए.एम.आर्ट मास्टर बांडराव बी.एस., श्रीमती पोकळे मॅडम, श्रीमती गाडे मॅडम, श्रीमती चौधरी मॅडम,श्री.नजान सर,डिसले सर, जावळे सर, भोसले सर, .जरे सर, मुळे सर, लाड सर, डांभे सर,भणगे सर, वाल्हेकर सर, अक्षय सर, पवार बिबिशन सर, महादेव पवार सर, छगन गाडे सर, बजगुडे महाराज तसेच सरपंच, उपसरपंच व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विजेते स्पर्धकांचे कौतुक करून अभिनंदन केले ज्ञानेश पोकळे, धनवडे पृथ्वीराज,अजिंक्य जाधव,तीर्थराज जाधवव ऋग्वेद पवार यांनी मशीन operete व स्टेज डेकोरेशन करण्यासाठी सहकार्य केले. त्यांचे सर्वाकडून अभिनंदन होत आहे.