जामखेड न्युज——
आणखेरी देवीच्या यात्रा उत्सवाची अखंड परंपरा कायम!
देवीच्या मानाची पूजा कुसळंबकरांकडून कायम सुरू
जामखेड तालुक्यातील धानोरा, फक्राबाद, वंजारवाडी सह परिसरातील दहा वीस गावांची मिळून आणखेरी देवी मोठी यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात थाटात संपन्न झाली. या देवीच्या पूजेचा, निवेद्यचा मान हा पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील नागरिकांचा असतो तो मान देखील दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात जपला जातो. यावर्षी आणखेरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न झाली.
आणखेरी देवी धानोरा, फक्राबाद, वंजारवाडी या गावांबरोबर कुसळंब गावाचा देखील तेवढाच मान देवीला असल्याने कुसळंबकरांची देखील मोठी उपस्थिती पहायला मिळते. कुसळंब गावच्या नागरिकांचा मान असल्याने पूजा पाठ आणि नैवेद्य दाखवल्यानंतर यात्रेला सुरुवात होते ही अनेक वर्षाची परंपरा आज देखील सुरू आहे.आणखेरी देवी ज्या पद्धतीने परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे त्याच पद्धतीने कुसळंबच्या नागरिकांची देखील श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी विशेष लक्ष कुसळंबकरांची असते कुसळंबाचे श्री खंडेश्वर देवस्थान ज्या पद्धतीने विकसित झाले असून नावारूपाला आली आहे, त्याच पद्धतीने आणखेरी देवी मंदिर विकसित होईल यासाठी कुसळंबवासीयांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्याचबरोबर परिसरातील नागरिक देखील कुसळंबकरांच्या विचारात सहभागी होऊन देवीच्या मंदिरासाठी एकत्रित येत आहेत.
देवीच्या परिसरातील धानोरा, फाक्राबाद, वंजारवाडी सह ज्या गावाचा मान देवीला आहे. ते म्हणजे कुसळंब गाव देखील मोठ्या उत्साहाने यात्रेमध्ये सहभागी होऊन हा यात्रा उत्सव संपन्न करण्यासाठी प्रयत्नशील कायम आहे.
चौकट
कुसळंबकर देवीच्या विकासासाठी कायम पुढाकार घेतील
जामखेड तालुक्यातील आनखेरी देवी धानोरा फकराबाद वंजारवाडी इत्यादी गावासह परिसरातील 10 ते 20 गावांची श्रद्धास्थान आहे. त्याचबरोबर देवीला कुसळंबकरांचा महत्त्वाचा मान असल्याने कुसळमचे ग्रामस्थ विशेष उपस्थित राहून पूजा पाठ व नैवेद्य पूर्णपणे यात्रा सुरू होण्यास कार्य करतात भविष्यकाळात देवीच्या विकासासाठी कुसळंबचे ग्रामस्थ कुठे कुठेही मागे पडणार नाहीत सर्व परिसरातील गावांना सोबत घेऊन देवीच्या विकासासाठी पुढाकार घेतील.
– ह.भ.प.कैलास महाराज पवार कुसळंब.