जामखेड न्युज——
डॉ.वैशाली कदम यांचा परिस्थितीशी दोन हात करून एमबीबीएस शिक्षण पूर्ण करण्याचा प्रवास प्रेरणादायी
ल.ना.होशिंग विद्यालयातील कुमारी डॉक्टर वैशाली भास्कर कदम हिने एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले.
आज ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचामध्ये मानाचा एक तुरा लावला गेला.
आज विद्यालयाच्या वतीने तिचा मोठा सन्मान करण्यात आला त्यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी आपल्या मनोगतामध्ये कोणत्याही शाळेचे,गावचे विद्यार्थी ज्यावेळेस मोठे होतात,यश संपादन करतात, शिक्षण घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात त्यावेळेस त्या शाळेला गावाला त्यांचा निश्चितच मोठा अभिमान होत असतो. अशीच कुमारी डॉक्टर वैशाली भास्कर कदम सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी आजही वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात अशा कठीण परिस्थितीतून परिस्थितीचा बाऊ न करता परिस्थितीचे दोन हात करून मुलीचे एमबीबीएस पर्यंत शिक्षण पूर्ण झाले व मुलगाही एमटेक पर्यंत शिक्षण घेत आहे. ल ना होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने डॉक्टर वैशाली भास्कर कदम तिचे अभिनंदन करण्यात आले
डॉक्टर वैशाली भास्कर कदम हीने आज ल ना होशिंग विद्यालयात शाळेत झालेला सत्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सत्कार असून हा मला नेहमी कायमस्वरूपी प्रेरणादायी राहील व शाळेतील गोड आठवणींना उजाळा देत तिने आपले मनोगत पूर्ण केले.
आज ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यावेळेस प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ,पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे, अनिल होशिंग भाऊसाहेब, सुरेश वाघमारे भाऊसाहेब ,प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.