जामखेड बाजार समितीसाठी प्रा. सचिन गायवळ यांच्या उमेदवारी अर्जाने येणार रंगत!!! राळेभात बंधू व प्रा. सचिन गायवळ ज्या बाजूला त्या पॅनलचा विजय निश्चित?

0
235

जामखेड न्युज——

जामखेड बाजार समितीसाठी प्रा. सचिन गायवळ यांच्या उमेदवारी अर्जाने येणार रंगत!!!

राळेभात बंधू व प्रा. सचिन गायवळ ज्या बाजूला त्या पॅनलचा विजय निश्चित?

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 18 जागांसाठी 198 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सेवा संस्था मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व माजी सभापती सुधीर राळेभात यांचे वर्चस्व आहे तर ग्रामपंचायत मतदारसंघात प्रा. सचिन गायवळ यांनी आपला दबदबा निर्माण केलेला आहे तेव्हा येणाऱ्या निवडणूकीत राळेभात बंधू व प्रा. सचिन गायवळ ज्या बाजूला त्या पॅनलचा विजय निश्चित अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेची निर्माण झाली आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 198 अर्ज मोठ्या संख्येने भरले आहेत. येत्या पंधरा दिवसात राजकीय घडामोडी होऊन किती उमेदवारी अर्ज प्रत्येक्षात राहतात व किती जणांना पॅनलमध्ये उमेदवारी मिळणार की नाराज उमेदवारांचा तिसरा पॅनल होणार हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे राहणार आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 

त्यातच सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने मोठी रंगत येणार आहे ते खरंच उमेदवारी अर्ज ठेवणार की माघार घेणार की कोणत्या आमदाराच्या पारड्यात वजन टाकणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा समर्थकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी बराच कालावधी असल्याने जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व त्यांची बंधू बाजार समितीचे माजी चेअरमन सुधीर राळेभात हे आमदार रोहित पवार की आमदार राम शिंदे यांच्याबरोबर युती करतात याच्यावरही बाजार समितीचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

एक मात्र खरे आहे येणारी बाजार समितीची निवडणुक ही मोठ्या आर्थिक उलाढालीची होणार असून आमदार पवार व आमदार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे की विकास कामावर निवडणूक होणार आहे हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.

प्रा.सचिन गायवळ यांचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, खर्डा सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले, खर्डा सोसायटीचे संचालक चंद्रकांत गोलेकर, भाजपाचे लहु शिंदे, जामखेडचे नगरसेवक शामीर भाई सय्यद, सोनेगावचे सरपंच पद्माकर बीरंगळ, जवळक्याचे माजी सरपंच कांतीलाल वाळुंजकर, लोणीचे माजी सरपंच बिभीषण परकड, वाकीचे सरपंच नाना वायकर, पिंपळगाव उंडा सरपंच गणेश जगताप, पोतेवाडीचे सरपंच प्रवीण पोते, सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार, मनोज भोरे इत्यादी कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here