सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे आयोजित लोकप्रिय गाण्यांचा अनोखा नजराणा जामखेडमध्ये ‘शिंदेशाही बाणा’

0
231

जामखेड न्युज——

सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे आयोजित लोकप्रिय गाण्यांचा अनोखा नजराणा जामखेडमध्ये ‘शिंदेशाही बाणा’

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंती निमित्त ‘शिंदेशाही बाणा’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे यांनी केले आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. संगीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्रातील एक सांगितीक घराणे ज्याला लोकसंगीतचा असाच वारसा लाभला आहे, या घराण्याच्या तब्बल पाच पिढ्या गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्या घराण्याने कव्वाली, पारंपरिक गाणी, भारुड, गोंधळ, प्रेम गीते इत्यादी गाऊन संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली असे ‘शिंदे घराणे’. प्रल्हाद शिंदेपासून सुरु झालेला हा संगीत प्रवास आल्हाद शिंदे म्हणजेच त्यांच्या पणतूपर्यंत सुरु आहे. संगीत क्षेत्रामध्ये अशी घराणी दुर्मिळच असतात ज्यांना पाच पिढ्यांचा वारसा लाभतो. ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमामधून जामखेड करांना संगीताची मेजवानी मिळणार आहे.

संध्याताई सोनवणे या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महिला व विद्यार्थ्यांनीसाठी आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात असंख्य महिला व विद्यार्थ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेत आपल्या आरोग्य विषयी माहिती कळली. 

स्वतः च्या गावच्या यात्रेनिमित्त नायगाव येथे नाथ महोत्सवाचे आयोजन करत लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. संध्याताई सोनवणे या नायगाव ग्रामपंचायत च्या सदस्य आहेत तसेच साऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत.

‘शिंदेशाही बाणा’ हा कार्यक्रम मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताजामखेड येथील बाजारतळ येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संध्याताई सोनवणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here