मराठी पत्रकार परिषदेचे कर्जत येथे शुक्रवारी तालूका पत्रकार संघ व जिल्हा पञकार संघ सन्मान सोहळ्याव्याचे आयोजन खा संजय राऊत,आ रोहित पवार,एस एस देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार…

0
154

जामखेड न्युज——

मराठी पत्रकार परिषदेचे कर्जत येथे शुक्रवारी तालूका पत्रकार संघ व जिल्हा पञकार संघ सन्मान सोहळ्याव्याचे आयोजन

खा संजय राऊत,आ रोहित पवार,एस एस देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार…

 

मराठी पञकार परीषदेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजीत आदर्श तालूका व जिल्हा संघाचा सन्मान सोहळा. तालूकाध्यक्षाचा मेळावा शुक्रवार ७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. शिवसेना नेते सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमूख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास बीड जिल्ह्यातील पत्रकार संघाने सहभागी व्हावे व मोठ्या संख्येने पञकार बांधवानी उपस्थीत राहवे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम यांनी केले आहे.


मराठी पत्रकार परिषदेच्या धयेयधोरणा नुसार सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील ४८ तालुका पत्रकार संघांना परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ६ जिल्हा संघांना देखील सन्मानीत करण्यात आले आहे. राज्यातील अनेक तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पत्रकार संघटन मजबुत करण्या बरोबरच पत्रकारांचे हक्क आणि माध्यम स्वातंत्र्या साठी काम करीत असतात. त्याच बरोबर सामाजिक बांधीलकी जपत विविध सामाजिक उपक्रम देखील राबवित असतात. त्यांच्या या कार्याचं राज्यस्तरावर कौतूक व्हावं, राज्य पातळीवर त्याच्या कामाची दखल घेतली जावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सहा वर्षां पासून परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. वसंतराव काणे यांच्या नावाने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि स्व. रंगाआण्णा वैध यांच्या नावे आदर्श जिल्हा संघ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हे सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागात घेतले जातात..

नागपूर येथे पहिला कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला..त्यानंतर पाटण,(जिल्हा सातारा) अक्कलकोट,(जिल्हा सोलापूर) वडवणी,(जिल्हा बीड) बोर्डी (जिल्हा पालघर, गंगाखेड (जिल्हा परभणी) आदि ठिकाणी हे सोहळे संपन्न झाले.. यावर्षीचे हे सातवे वर्ष असून कर्जत (जिल्हा अहमदनगर) येथे खा. संजय राऊत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. आ. रोहीत पवार हे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे तर यावेळी विश्वस्त किरण नाईक व अध्यक्ष शरद पाबळे, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, अनिल वाघमारे, सुभाष चौरे, विशाल साळुंखे व इतर पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळया बरोबरच दरवर्षी तालुका अध्यक्षांचा मेळावा देखील घेतला जातो.५०० ते ६०० पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित असतात.

 

राज्यात काही जिल्हा संघांची व तालुका संघाची कामे देखील उल्लेखनीय आहेत अशा जिल्हा व तालुका संघांचा देखील सन्मान केला जातो. आतापर्यंत नाशिक, भंडारा, पुणे, सिंधुदुर्ग, नांदेड, बीड जिल्हा संघ व आष्टी तालुका युवा पत्रकार संघाला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.कर्जत येथे शुक्रवारी होत असलेल्या सोहळ्यास पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पञकार परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here